घरलाईफस्टाईलगुगल अ‍ॅप्स झाले क्रॅश : 'हा' आहे उपाय

गुगल अ‍ॅप्स झाले क्रॅश : ‘हा’ आहे उपाय

Subscribe

गुगलने याची माहिती वर्कस्पेस स्टेटस पेजवर ही माहिती दिली आहे.

आजच्या युगात विज्ञान तंत्रज्ञान प्रचंड प्रगती झाली असून, तंत्रज्ञान ही काळाची गरज बनली आहे. त्यातच जगभरात गुगलच्या युझर्सची संख्या करोडो आहे. याशिवाय गुगलचे अ‍ॅप वापरल्याशिवाय दिवसच पुर्ण होत नाही. त्यातच गुगल पे ,जीमेल आणि गुगल क्रोम, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप हे दैंनंदिन जीवनातील आवश्यक अॅप क्रॅश होण्याची घटना घडल्याने युझर्स त्रस्त झाले आहेत. हल्ली हे अ‍ॅप क्रॅश होण्याची घटना सतत घडत आहे. या समस्येचे निराकरण होइपर्यंत एक नवी शिफारस गुगलने आणली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी गुगलने ‘डेस्कटॉप व्हर्जन’ची शिफारस केली आहे. गुगलने याची माहिती वर्कस्पेस स्टेटस पेजवर ही माहिती दिली आहे. या समस्येवर सध्या टेक कंपनी काम करत आहे. जेव्हा या समस्या दूर होईल तेव्हा युझर्सना कळवण्यात येईल. जीमेलनेसुद्धा आपल्या ऑफिशिअल पेजवर यासंदर्भात माहिती दिली आहे.

 अ‍ॅप क्रॅश समस्येवर उपाय

या अ‍ॅप क्रॅशमुळे सर्वच युझर्सला कामामध्ये व्यत्यय येत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी मोबाइलच्या सेंटिग्जमध्ये जाऊन अ‍ॅप्स पर्याय निवडा .त्यानंतर तीन डॉटवर क्लिक करुन, तिथे शो सिस्टम अ‍ॅप्स हा पर्याय निवडा. त्यानंतर अ‍ॅन्ड्रॉईड वेबव्ह्युव क्लिक करुन अनइस्टॉल अपडेट्स पर्याय निवडा.

- Advertisement -

हेही वाचा – Lockdown: बीड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन! काय चालू, काय बंद असणार? वाचा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -