घरभक्तीVastu Tips : आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावा 'हे' झाड

Vastu Tips : आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावा ‘हे’ झाड

Subscribe

काही झाडे घराच्या मुख्य दाराजवळ लावणे अशुभ देखील मानले जातात. यामुळे अनेक वास्तुदोष सुद्धा उत्पन्न होतात.

वास्तू शास्त्रानुसार घराच्या आजूबाजूच्या परिसरात झाडं लावणं अत्यंत शुभ मानले जाते. शिवाय यामुळे घरात राहणाऱ्या लोकांचे आरोग्य देखील चांगले राहते. झाडांमुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेकजण घर बाहेरून सुंदर दिसावे यासाठी घराबाहेर वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावतात. मात्र त्याच झाडांपैकी काही झाडे घराच्या मुख्य दाराजवळ लावणे अशुभ देखील मानले जातात. यामुळे अनेक वास्तुदोष सुद्धा उत्पन्न होतात. याचं गोष्टी लक्षात घेऊन घराच्या मुख्य दाराजवळ तुम्ही कोणती झाडं लावू शकता हे जाणून घ्या.

तुमच्या मुख्य दाराजवळ लावण्यासाठी ही ५ झाडं आहेत शुभ

- Advertisement -
  • तुळशीचं रोपटं
    हिंदू धर्मात तुळशीच्या रोपट्याला अत्यंत प्रवित्र स्थान आहे. प्रत्येक हिंदू व्यक्तीच्या घराबाहेर तुळशीचे रोपटे लावलेले असते. तुळशीमुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. तुळशीमुळे घर नेहमी धन-धान्याने परिपूर्ण राहते.
  • मनी प्लांट
    मनी प्लांट तुम्ही घरामध्ये किंवा घराबाहेर देखील लावू शकता, मनी प्लांट मुख्य दाराजवळ लावल्याने घरामध्ये सुख-समृद्धी येते.
  • लिंबाचे झाड
    वास्तूशास्त्रानुसार घराबाहेर लिंबाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरातील व्यक्तींचे भाग्य चमकते. लिंबाचे झाड मुख्य दाराच्या उजव्या बाजूला लावावे.
  • ताडाचे झाड
    असं म्हणतात की, ताडाचे झाड मुख्य दाराजवळ लावले तर ते सकारात्मक ऊर्जा अधिक वाढते.
  • फर्न प्लांट
    फर्न प्लांट घराबाहेर लावल्याने कुटुंबातील लोकांसाठी ते भाग्यकारक मानले जाते. शिवाय या झाडामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते.

 


हेही वाचा :Vastu Tips : घरामध्ये ‘या’ प्रकारचे फोटो लावणे मानले जाते अशुभ

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -