घरताज्या घडामोडीAryan Khan Drugs Case : आर्यन खानच्या क्लीनचीटवर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया

Aryan Khan Drugs Case : आर्यन खानच्या क्लीनचीटवर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी (Aryan Khan Drugs Case) प्रकरणात एनसीबीकडून बॉलिवूड अभिनता शाहरूख खानच्या मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. त्यानंतर ड्रग्ज प्रकरणाला राजकीय वळण लागताच राज्यासह संपूर्ण देशभरात चर्चेला उधाण आलं. या प्रकरणात आता एनसीबीने (NCB) आर्यन खानला क्लीनचीट दिली आहे. अशातच कॉर्डेलिया क्रूझवर (Cordelia Cruise) धाड टाकत कारवाई केलेल्या मुंबई एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आर्यन खानला क्लीनचीट मिळाल्यानंतर समीर वानखेडे म्हणाले की, माफ करा, मला या प्रकरणावर काहीही बोलायचं नाहीये. मी सध्या एनसीबीमध्ये नाहीये. त्यामुळे जे काही करायचे असेल ते एनसीबीच्या अधिकाऱ्यांना विचारा, असं वानखेडे म्हणाले.

- Advertisement -

एनसीबीकडून शुक्रवारी एनडीपीएस कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले. दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रामध्ये आर्यन खानच्या नावाच्या समावेश नव्हता. ड्रग्ज केस प्रकरणात आर्यन खानविरोधात कोणतेही पुरावे न मिळाल्यामुळे त्याच्या नावाचा समावेश हा आरोप पत्रात करण्यात आलेला नाही.

आरोपपत्रात कोणाचा समावेश?

एनडीपीएस कोर्टात एनसीबीकडून ड्रग्ज प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले. मात्र, या आरोपपत्रात आर्यन खानच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाहीये. त्याच्याविरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याने त्याला क्लीनचीट मिळाली आहे. आर्यन खानसोबत साहू आनंद, सुनील सेह यांनी देखील क्लीनचीट देण्यात आली आहे. मात्र, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चेंट यांना ड्रग्ज प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणात २० जणांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु आतापर्यंत सहा जणांना क्लीनचीट मिळालं आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

२ ऑक्टोबर रोजी क्रूझवर एनसीबीने कारवाई करत ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आली होती. त्यानंतर २६ दिवसांनी आर्यन खान याला जामीन मिळाल्यावर आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली.


हेही वाचा : Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला ड्रग्स प्रकरणातून दिलासा; एनसीबीने दिली क्लीनचिट


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -