घरलाईफस्टाईलदुकानदार सामान पुन्हा घेण्यास नकार देऊ शकतो का?

दुकानदार सामान पुन्हा घेण्यास नकार देऊ शकतो का?

Subscribe

No refund…No return असे बोर्ड दुकानाबाहेर बहुतांश दुकानदार लावतात. त्यामुळे ज्या ग्राहकांना तेथून खरेदी करायची असते ते असा बोर्ड पाहिल्यानंतर खरंच तेथे खरेदी करावी का याचा विचार करतात. खरंत नो रिफंड नो रिर्टनच्या पॉलिसीबद्दल तज्ञ काय सांगतात हे पाहूयात. (Product return policy)

अर्थतज्ञ असे सांगतात की, जर निश्चित काळात प्रोडक्ट देण्यास तो असमर्थ ठरल्यास तर तुम्ही त्याच्याकडे रिफंड मागू शकता. हा कायदेशीर हक्क ग्राहकाला दिलेला आहे. अशातच जर दुकानदाराने पैसे परत दिले नाही किंवा देण्यास नकार दिल्यास तुम्ही त्याला डिमांड नोटीस पाठवू शकता. जर दुकानदार यानंतर सुद्धा नकार देत असेल तर तुम्ही ग्राहक संरक्षण अधिनियम अंतर्गत त्याच्या विरोधात तक्रार करु शकता.

- Advertisement -

जाहिरातीवरील माहिती चुकीची असेल तर…
2019 च्या ग्राहक संरक्षण अधिनियम ग्राहकांना खरेदीच्या 15 दिवसातच सामान परत करण्याचा अधिकार असतो. अशातच जर तुम्हाला मिळालेल्या प्रोडक्टमध्ये फॉल्ट असेल किंवा जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे नसेल तर तुम्ही त्याच्या विरोधात अॅक्शन घेऊ शकता. परंतु दुकानदाराकडे सुद्धा तुम्ही केलेली एखादी चुक असेल तर तो पैसे परत देण्यास नकार देऊ शकतो. (Product return policy)

- Advertisement -

खाद्यपदार्थ खराब असतील तर घ्या अॅक्शन
जर तुम्ही एखादा खाद्यपदार्थ खरेदी केला आणि तो खराब असेल किंवा एक्सपायरी डेट नंतर सुद्धा तु्म्हाला तो विक्री केला गेल्यास तर तुम्ही दुकानदाराला परत करु शकता. जर दुकानदाराने ते घेण्यास नकार दिला तर कंज्युमर कोर्टात तुम्ही तक्रार दाखल करु शकता.


हेही वाचा- घरकाम करणाऱ्या बाईला पैसे देण्याऐवजी घरी आणा हे Vacuum Cleaner

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -