घरलाईफस्टाईलMahashivratri 2021: जाणून घ्या यंदाच्या महाशिवरात्री महत्व, तिथी आणि मुहूर्त

Mahashivratri 2021: जाणून घ्या यंदाच्या महाशिवरात्री महत्व, तिथी आणि मुहूर्त

Subscribe

हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे पर्व मोठ्या भक्तिभावाने साजरा केले जाते. माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी महाशिवरात्र साजरी होते. यंदा ११ मार्च रोजी राज्यभरात महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो व शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री’ असे म्हणतात. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिना हा वर्षाचा शेवटचा महिना असतो. या महिन्यात कृष्ण पक्षाची चतुर्दशीला महाशिवरात्रीचा सण येतो. असे म्हटले जाते की, अध्यात्मिक साधकांसाठी शिवरात्र म्हणजे नूतन वर्षारंभ असतो. या दिवशीच्या उपवासाला विशेष महत्व आहे. यासह पूजा केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि भाविकांच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण करतात.

महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचं महत्त्व 

हिंदू शास्त्रात महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करण्याचे अध्यामिक आणि वैज्ञानिक महत्त्वदेखील आहे. महाशिवरात्रीला मोठं धार्मिक महत्त्व आहे. महाशिवरात्रीची रात्र ही भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाची रात्र असल्याचे मानले जाते. मान्यतेनुसार, या दिवशी महादेवांनी वैराग्य जीवनातून गृहस्थ जीवनात पाऊल ठेवलं होतं. ही रात्र शिव आणि पार्वती मातेसाठी अत्यंत विशेष मानली जाते. याच दिवशी जे भाविक रात्री जागरण करून महादेवाची पूजा करतात त्यांच्यावर भगवान शिवासह माता पार्वती देखील भक्तांना आशीर्वाद देतात. त्यांच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे महाशिवरात्रीला जागरण केले जाते.

- Advertisement -

दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्णपक्ष त्रयोदशीच्या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी महाशिवरात्री ११ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. असे म्हटले जाते की, हा महाशिवरात्रीचा दिवस शिवयोग आणि घनिष्ठा नक्षत्रामुळे अतिशय लाभदायक होणार आहे. ज्योतिषानुसार यादिवशी चंद्र मकर राशीत विराजमान होणार आहे. जे भक्त यादिवशी शंकराची पूजा करतात त्यांचे सर्व कष्ट, दुःखे दूर होतात आणि जीवन आनंदमय राहते. अविवाहित मुलींसाठी हा दिवस अतिशय अनुकूल असतो. ज्या मुली महाशिवरात्रीचे व्रत करतात आणि शंकराची पूजा करतात त्यांना योग्य पती मिळतो. जर एखाद्या मुलीच्या विवाहात विघ्ने येत असतील तर शंकराची पूजा केल्याने सर्व अडचणी दूर होतात. भुताप्रेतांच्या त्रासापासूनही मुक्ती मिळते.

महाशिवरात्रीची तिथी आणि शुभमुहूर्त

  • महाशिवरात्री तिथी: – ११ मार्च २०२१, गुरुवार
  • महाशिवरात्री निशिता काल: रात्री १२.०६ ते १२.५५ पर्यंत
  • महाशिवरात्री प्रथम प्रहर: संध्याकाळी ६.२७ ते ९.२९ पर्यंत
  • महाशिवरात्री द्वितिय प्रहर: रात्री ९.२९ ते १२.३१ पर्यंत
  • महाशिवरात्री तृतीय प्रहर: रात्री १२.३१ ते ३.३२ पर्यंत
  • महाशिवरात्री चतुर्थ प्रहर: १२ मार्च सकाळी ३.३२ ते ६.३४ पर्यंत
  • महाशिवरात्री पारण समय: १२ मार्च सकाळी ६.३४ ते संध्याकाळी ३.०२ पर्यंत
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -