Friday, February 19, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल WhatsApp ची प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारावीच लागणार, नाहीतर...­­­­­­­­­­­­­­­­­­­­

WhatsApp ची प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारावीच लागणार, नाहीतर…­­­­­­­­­­­­­­­­­­­­

WhatsApp ही नवी पॉलिसी 15 मार्चनंतर अंमलात आणणार आहे.

Related Story

- Advertisement -

हल्ली सर्वांचीच मूलभूत गरज असलेले WhatsApp चर्चेत आहे. बरेच दिवस गोपनीयता धोरणांमुळे WhatsApp वादाच्या कचाट्यात अडकलेले आहे. नवे गोपनीयता धोरण लागू करण्यासाठी WhatsAppने भारतामध्ये एका नव्या मोहिमेची घोषणा केली आहे. ती समजून घेण्यासाठी आणि स्वीकाण्यासाठी युजर्सना काही वेळ दिला आहे. WhatsAppने या नव्या गोपनीयता धोरणासाठी छोट्या बॅनरचा केला असून ज्याचा पर्याय युजर्सना चॅट लिस्टवर दिसेल.

याआधी WhatsAppच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीला स्वीकारण्याची अंतिम तारीख 8 फेब्रुवारी 2021 देण्यात आली होती. त्यामुळे युजर्स WhatsAppला पर्याय म्हणून सिग्नल अ‍ॅपकडे वळले होते. त्यावरुन झालेल्या वादानंतर WhatsAppने ही मर्यादा वाढवून ही नवी पॉलिसी 15 मार्चनंतर अंमलात आणण्यात येईल. मात्र, त्यानंतर जे हे अपडेट स्वीकारणार नाहीत त्यांच WhatsApp बंद होणार आहे. म्हणून हे नवे अपडेट स्विकारण्याचा पर्याय दिला आहे.

- Advertisement -

नव्या मोहिमध्ये नक्की काय आहे

युजर्सच्या चॅटलिस्टवर गोपनीयता धोरणांबाबत एक मॅसेज येइल की, आम्ही आमचे नियम-अटी तसेच प्रायव्हसी पॉलिसी बदलत असून ती वाचण्यासाठी क्लिक करा. ते क्लिक केल्यावर व्हॉट्सअपने प्रायव्हसी पॉलिसीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये व्हॉट्सअपने पहिल्यांदाच हे स्पष्ट केलं की, आम्ही तुमचे मॅसेजेस वाचत नाही, आम्ही आपल्या प्रायव्हसीचा आदर करतो. अशी विश्वसनीयता व्यक्त केली आहे. मात्र, बिजनेसेसबाबतचे चॅटचे पर्याय आम्ही आणखी सोपे करण्यासाठी हे बदल व्हॉट्सअपने केल्याचे म्हटलं आहे. त्यानंतर नवे अपडेट कसे असणार आहे. याबाबतची माहिती दिली आहे. या सगळ्यात कुठेही आम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीत बदल करणार नसल्याचं व्हॉट्सअपने पुन्हा स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

जगभरातील युझर्स या अ‍ॅपद्वारे फक्त मेसेजेस, फोटो आणि व्हिडिओ पाठवत नाहीत तर त्यासोबत व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंगही करतात. त्यामुळे आपल्या गोपनीयतेबाबत युजर्समध्ये अनेक संभ्रम आहेत. लोक WhatsApp केवळ वैयक्तिक वापरासाठीच नाही तर व्यावसायिक वापरासाठीही वापरतात. त्यामुळे बिजनेसेसबाबतचे चॅटचे पर्याय आणखी सोपे करण्यासाठी WhatsAppने ही प्रायव्हसी काढली आहे.


हेहि वाचा – महाराष्ट्राच्या घराघरात अन् मनामनात शिवजयंतीचा आनंदोत्सव साजरा होऊदे – अजित पवार

- Advertisement -