घरलाईफस्टाईलWinter Health Tips: सर्दी पडशापासून दूर राहायचयं ? मग डाएटमध्ये करा 'या'पदार्थांचा...

Winter Health Tips: सर्दी पडशापासून दूर राहायचयं ? मग डाएटमध्ये करा ‘या’पदार्थांचा समावेश

Subscribe

हिवाळ्यात सर्दी पडसे होणे सामान्य जरी असले तरी सध्याच्या कोरोनाकाळात मात्र या आजाराबद्दल भिती आहे. यामुळे शिंक जरी आली, नाक गळायला लागलं की अनेकांच्या पोटात गोळा येतो. पण खरं तर थंडीच्या दिवसात सर्दी पडसे झाल्यावर किंवा होऊ नये म्हणून डाएटमध्ये खाली दिलेल्या पदार्थांचा समावेश करावा म्हणजे सर्दी पडसे तर होणारच नाही आणि झाले तरी लवकर आराम मिळेल.

orange

- Advertisement -

संत्री- हिवाळ्यात संत्री खाणे फायदेशीर असते. संत्र्यामध्ये मुबलक फायबर असते. तसेच यातील व्हिटीमीन सी आणि अँटीऑक्सीडेंट मुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. तसेच या व्हिटामीन्समुळे संसर्गाचा धोक्यापासून बचाव होतो.

मसाला चहा- थंडीमध्ये एक कप गरमागरम चहा पिणं प्रत्येकाला आवडतं. पण त्यातही जर तुम्ही मसाला चहा पित असाल तर त्याचे दुहेरी फायदे शरीराला होतात. मसाल्यातील लवंग, दालचिनी, काळी मिरीमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. तसेच सर्दी पडशापासून बचाव होतो.

- Advertisement -

लसूण-लसणामुळे जेवणाची चव तर वाढतेच. पण एवढाच लसणाचा उपयोग नसून त्यातील अँटी इफ्लेमेटरी आणि अँटी मायक्रोबायल गुणामुळे शरीरही आतून मजबूत होते. त्यामुळे सर्दी खोकला सारख्या मोसमी आजारापासून संरक्षण मिळते.

हळद- हळदीमध्ये करक्यूमिन असते जे औषधी असते. यात अँटीऑक्सिडेंट, अँटीसेप्टीक, अँटीवायरल आणि अँटी इफ्लेमेटरी गुणही असतात. जे शरीराला आतून मजबूत करतात. अन्नपचनही सहज होते. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

मध-तज्ञांच्या माहितीनुसार जर सर्दी खोकला झाला असेल तर मधाचे सेवन करावे. मध आणि आल्याचा रस एकत्र करून पिल्यास खशातील खवखव थांबते. खोकल्यापासून आराम मिळतो. त्यातही जर तुम्ही रोज आल आणि मधाचा रस घेतलात तर सर्दी तुमच्यापासून कोसभर लांब राहते.

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -