घरटेक-वेकGoogle Chrome : गुगल क्रोम लवकर अपडेट करा! केंद्र सरकारने दिली धोक्याची...

Google Chrome : गुगल क्रोम लवकर अपडेट करा! केंद्र सरकारने दिली धोक्याची सूचना

Subscribe

जवळपास प्रत्येकजण वापरत असलेले लोकप्रिय इंटरनेट ब्राउझर म्हणजे गुगल क्रोम. आज भारतासह जगभरातील सर्वाधिक लोक या ब्राउझरचा वापर करतात. मात्र हे ब्राउझर आता हॅकिंर्सच्या निशाण्यावर आहे. त्यामुळे या ब्राउझरच्या प्रायव्हसीवर धोका निर्माण झाला आहे. अशातच सायबर हल्लेखोरांकडून या ब्राउझरमार्फत कोणाच्याही कम्प्युटरमधील प्रायव्हेट गोष्टींवर हल्ला होण्याचा धोका आहे अशा इशारा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने दिला आहे. यात गुगल क्रोम ब्राऊझर युजर्सच्या कम्प्युटरमधील पर्सनल डेटा सायबर हल्लेखोरांच्या हाती लागू शकतो किंवा या हल्लेखोरांकडून कम्प्युटरमधील मालवेअर देखील इंजेक्ट केले जाऊ शकते. हा धोका लक्षात घेता गुगलने क्रोम ब्राउझरचे अपडेट व्हर्जन जाहीर केले आहे.

तसेच गुगल क्रोम ब्राउजर युजर्सलाही सुरक्षेचा विचार करून सॉफ्टवेअर अपडेट करण्याचे आवाहन केलेय. Google ने अलीकडेच घोषणा केली आहे की, Windows, Mac आणि Linux साठी Chrome स्थिर चॅनल 96.0.4664.93 वर अपडेट केले गेले आहे. जे येत्या काही दिवस/आठवड्यांमध्ये रोल आउट केले जाईल. संशोधकांनीही नजरेत आणून दिले की, २२ तांत्रिक धोके लक्षात घेत गुगल क्रोमचे अपडेट किंवा लेटेस्ट व्हर्जन जाहीर करण्यात आले आहे.

- Advertisement -

आयटी मंत्रालयाचा सल्ला

आयटी मंत्रालयाचा एक भाग असलेल्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने Google Chrome इंटरनेट ब्राउझर वापरकर्त्यांना ‘हाय रिस्क’इशारा जारी केला आहे. अॅडव्हायझरीनुसार, Google Chrome ब्राउझरचा हल्लेखोरांकडून गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे युजर्सने थोडे सावध असणे आवश्यक आहे.


Inflation : गृहिणींना मोठा दिलासा! डाळींच्या दर प्रति क्लिंटल ८०० रुपयांची घसरण


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -