घरमुंबईSalman Khan : सरकार सलमानच्या पाठीशी; प्रकरणाची सखोल चौकशी करणार - एकनाथ...

Salman Khan : सरकार सलमानच्या पाठीशी; प्रकरणाची सखोल चौकशी करणार – एकनाथ शिंदे

Subscribe

सरकार सलमान खानच्या पाठीशी असून त्याच्या घरावरील गोळीबार प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेने सोमवारी रात्री गुजरातमधील भुज येथून दोन आरोपींना अटक केल्याची माहिती समोर येत आहे. विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानच्या त्यांच्या गॅलक्सी या निवास्थानी भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, सरकार सलमान खानच्या पाठीशी असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. (Eknath Shinde will conduct a thorough investigation into the firing case at Salman Khans house)

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना मुंबई पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. सदर आरोपींना भुजमधून अटक करण्यात आली आहे. विक्की गुप्ता आणि सागर पॉल अशी आरोपींची नावे आहेत. ते दोघे बिहारचे रहिवासी आहे. पोलिसांनी त्या दोघांची 25 एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी घेतली आहे. दोन्ही आरोपींची सखल चौकशी करून सत्य बाहेर येईल. पोलीस आयुक्तांना प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याच्या सूचना देण्यता आल्या आहेत. या प्रकरणामागे कोण आहे, याचा शोध पोलीस घेतली आणि कठोर कारवाई करतील. यापुढे अशा प्रकारची हिंमत कोणीही करत कामा नये, अशी जरब पोलीस आरोपींवर बसवतील, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

सलमान खानची आणि त्याच्या कुटुंबाची सुरक्षा वाढवण्याची सूचना पोलीस आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. तसेच आज सलमान खानला भेटून मी त्याला दिलासा दिला की, सरकार तुमच्या पाठीशी उभं आहे. सलमानची आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेची सरकारची जबाबदारी आहे. पुन्हा अशाप्रकारचं धाडस कोणी करू नये, याची काळजी सरकार घेईल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानची भेट घेतली. यावेळी तिथे त्यचाे वडील ज्येष्ठ पटकथाकार सलीम खान उपस्थित होते. तसेच माजी आमदार बाबा सिद्दीकी, आमदार झिशान सिद्दीकी आणि युवासेनेचे राहुल कनाल हेदेखील उपस्थित होते.

दोन्ही आरोपींना गुजरातमधून अटक (Both accused arrested from Gujarat)

दरम्यान, सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर मुंबईतून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना एका दिवसात अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले. गुजरातमधील भुज येथून आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना आता चौकशीसाठी मुंबईत आणले आहे. आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपींची ओळख पटवली आहे. तसेच मागील निवेदनात गुन्हे शाखेने असेही म्हटले होते की, गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींपैकी एकावर खंडणी, खून इत्यादी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

- Advertisement -

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -