घरमहा @२८८अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १६६

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १६६

Subscribe

अंधेरी पूर्व (विधानसभा क्र. १६६) हा मुंबई उपनगरातला विधानसभा मतदारसंघ आहे.

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातल्या इतर मतदारसंघांप्रमाणेच २०१४च्या निवडणुकांमध्ये हा मतदारसंघ देखील काँग्रेसच्या हातून निसटून उजव्या विचारसरणीच्या पक्षांकडे आला. अंधेरी पश्चिमप्रमाणेच अंधेरी पूर्वमध्ये देखील नागरी समस्यांचे मुद्दे महत्त्वाचे ठरतात. याच आधारावर काँग्रेसच्या उमेदवाराला नाकारून इथल्या मतदारांनी शिवसेनेच्या पारड्यात आपलं मत टाकलं होतं. या मतदारसंघात एकूण २५२ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १६५

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,५७,८९६
महिला – १,२८,३८६

- Advertisement -

एकूण मतदार – २,८६,२८२


Ramesh Latke
रमेश लटके

विद्यमान आमदार – रमेश लटके, शिवसेना

सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदापासून आपली छाप पाडायला रमेश लटके यांनी सुरुवात केली होती. त्यात त्यांना यश आल्यानंतर १९९७ पासून २०१२पर्यंत सलग ३ वेळा ते मुंबई महानगर पालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. त्यानंतर २०१४मध्ये त्यांना शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेचे तिकीट देण्यात आले. भाजपचे उमेदवार सुनील यादव यांचा जवळपास ५ हजार मतांनी पराभव करत ते आमदार झाले. २०१८मध्ये विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधी त्यांचे सचिव विनोद अग्रवाल यांचा मृतदेह नागपूरच्या आमदार निवासात आढळल्यामुळे वाद निर्माण झाला होता.


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) रमेश लटके, शिवसेना – ५२,८१७
२) सुनील यादव, भाजप – ४७,३३८
३) सुरेश शेट्टी, काँग्रेस – ३७,९२९
४) संदीप दळवी, मनसे – ९४२०
५) नोटा – १६३२

मतदानाची टक्केवारी – ५३.४५ %


हे वाचा – मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -