घरमहा @२८८इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २८३

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २८३

Subscribe

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (विधानसभा क्र. २८३) विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ म्हणजे राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांचा मतदारसंघ. सलग पाच विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांनी विरोधकांना पराभवाची धूळ चारत राष्ट्रवादी काँग्रेसचे या मतदारसंघावरील वर्चस्व कायम ठेवले आहे. पण या मतदारसंघातील पेठनाका-सांगली रस्त्याचे रुंदीकरण, ग्रामीण-शहरी भागातील रस्त्यांची दूरवस्था, मिरज तालुक्यातील क्षारफुटीच्या जमिनींचा प्रलंबित प्रश्न, ऊसदराचा प्रश्न, जलस्वराजच्या पाणी योजनेतील गैरप्रकारांकडे दुर्लक्ष आणि प्रशासनाचा मनमानी कारभार यासाठी येथील विद्यमान आमदारांना जबाबदार धरण्यात येत आहे. तसेच गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत या मतदारसंघातील राजकारणात महत्त्वाचे बदल घडले आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे जयंत पाटील यांचे शिलेदार म्हणून ओळख असलेले निशिकांत पाटील आणि आष्ट्याचे वैभव शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत येथील जनता कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

मतदारसंघ क्रमांक – २८३
मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

पुरुष – १,२९,५७६
महिला – १,१९,८८१
एकूण – २,४९,४५७

- Advertisement -

विद्यमान आमदार – जयंत राजाराम पाटील

Jayant patil
विद्यमान आमदार – जयंत राजाराम पाटील

इस्लामपूर मतदारसंघाचे जयंत राजाराम पाटील हे विद्यमान आमदार आहेत. १६ फेब्रुवारी १९६२ रोजी जयंत पाटील यांचा सांगलीमध्ये जन्म झाला. ते उच्चशिक्षित आहेत. त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याबरोबरच प्रवासाची आवड आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार अभिजीत पाटील यांचा दारूण पराभव केला होता.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) जयंत राजाराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस – १,१३,०४५
२) अभिजीत पाटील, अपक्ष – ३७,८५९
३) जितेंद्र पाटील, काँग्रेस – १८,१८७
४) बी. जी. पाटील, अपक्ष – ५,८३०
५) उदय पाटील, मनसे – १,२३४


हेही वाचा – कागल विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -