घरताज्या घडामोडीजळगाव जिल्ह्यात भीषण अपघात; १० ठार तर ७ जण गंभीर जखमी

जळगाव जिल्ह्यात भीषण अपघात; १० ठार तर ७ जण गंभीर जखमी

Subscribe

जखमींना जळगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जळगाव जिल्ह्यातील येवला-फैजपूर रस्तावरील हिंगोणा गावाजवळ क्रुझर-डंपरचा भीषण अपघात घडला आहे. या अपघात १० जण जागीच ठार झाले असून सात जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसंच सर्व जखमींना जळगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दोन महिला असल्याचं समोर येत आहे. चोपडा येथून हे प्रवासी स्वागत समारंभ आटोपून येत असताना हा अपघात झाला. तात्काळा येवला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने वाहनांना बाहेर काढण्यात आलं आहे. हा अपघात रविवारी रात्री ११ वाजल्याच्या सुमारास घडला आहे.

मृत व्यक्तींची नावं

१) प्रिया जितेंद्र चौधरी (वय १०)
२) प्रियांका नितीन चौधरी (वय २५)
३) उमेश चौधरी (वय २८)
४) संगीता मुकेश पाटील (वय ३३)
५) गंगाबाई ज्ञानेश्वर चौधरी (वय ३५)
६) सोनाली जितेंद्र चौधरी (वय ३५)
७) सोनल सचिन महाजन (वय ३७)
८) प्रभाबाई प्रभाकर चौधरी (वय ४५)
९) सुमनबाई श्रीराम पाटील (वय ६०)
१०) प्रभाकर नारायण चौधरी (वय ६३)

- Advertisement -

जखमींची नावं

१) अंवी नितीन चौधरी
२) शंतनू मुकेश पाटील
३) मीना प्रफुल्ल पाटील
४) सर्वेश नितीन चौधरी
५) आदिती मुकेश पाटील
६) सुनिता राजाराम चौधरी
७) शिवम प्रभाकर


हेही वाचा – सांगली: गाडी विहिरीत कोसळून ५ जणांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -