घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक जिल्ह्यात १०० मॉडेल शाळा; झेडपीची महत्वाकांशी योजना

नाशिक जिल्ह्यात १०० मॉडेल शाळा; झेडपीची महत्वाकांशी योजना

Subscribe

नाशिक : रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे समाजासाठी राबविले जाणारे उपक्रम आणि प्रकल्प भूषणावह आहेत. समाजाच्या विकासात रोटरी संस्थेचे कार्य अमुल्य असून, यापुढील काळात नाशिक जिल्हा परिषददेखील रोटरी संस्थेसोबत काम करेल. जिल्ह्यात लवकरच आदर्श गाव संकल्पना तसेच 100 मॉडेल स्कूल विकसित करण्याचा आपला मानस असल्याचे जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले.

रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे राबविण्यात येणार्‍या दीर्घकालीन सेवा प्रकल्पांचा आढावा घेणारा ‘उडान’ हा कार्यक्रम नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. या कार्यक्रमात रोटरी फाऊंडेशनच्या सहकार्‍याने राबविण्यात येणारे प्रकल्प मॅग्नम हॉस्पिटलमधील ह्रदय शस्त्रक्रिया सुलभ करणारे कॅथलॅब आणि नेल्सन हॉस्पिटलच्या निओनेटल आयसीयू या प्रकल्प याविषयी माहिती देण्यात आली. रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मानद सदस्यत्व स्वीकारण्याचेही त्यांनी मान्य केले.

- Advertisement -

या उपक्रमांमध्ये जटील शस्त्रक्रिया करण्यात येऊन अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे. याशिवाय जळीत रुग्णांना वरदान ठरणारी स्किन बँक, शीत शवपेटीका, दीर्घकालीन आजारांना सामोरे जाणार्‍या रुग्णांना मदत करणारी रोटरी रुग्ण साहित्य सेवा, थेट शेतकर्‍यांकडून ग्राहकांपर्यंत पोहोचविणारा उपक्रम रोटरी शेतकरी बाजार, वात्सल्य मदर मिल्क बँक, आदिवासी गावात पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याची सोय करून देणारे लघु पाटबंधारे प्रकल्प, बिबट्याच्या दहशतीपासून बचाव करणारे सोलर स्ट्रीट लाईट, पर्यावरण रक्षण आणि आदिवासींच्या आरोग्याची काळजी घेणारे निर्धुर चूल वाटप अशा विविध प्रकल्पांची माहिती एकत्रितपणे प्रथमच मांडण्यात आली. प्रारंभी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष प्रफुल बरडीया यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली.

यावेळी माजी प्रांतपाल रमेश मेहेर यांच्या हस्ते देणगीदार मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रोटरीचे डीस्ट्रीक सचिव रणजीत साळवी, सचिव ओमप्रकाश रावत यांच्यासह सीएसआर संचालक कमलाकर टाक, टीआरएफ संचालक सुधीर जोशी, मंथ लीडर विनीत कोटावर, अनुजा चौगुले यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी विशेष प्रयत्न केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -