घरताज्या घडामोडीउद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; नारायण राणेंना 5 जानेवारीला न्यायालयात हजर राहाण्याचे आदेश

उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; नारायण राणेंना 5 जानेवारीला न्यायालयात हजर राहाण्याचे आदेश

Subscribe

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणात केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आज दिनांक 1 डिसेंबर रोजी रायगड जिल्ह्यातील जिल्हा न्यायालयात उपस्थित राहिले होते.

अलिबाग (अमूलकुमार जैन) : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणात केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आज दिनांक 1 डिसेंबर रोजी रायगड जिल्ह्यातील जिल्हा न्यायालयात उपस्थित राहिले होते. यावेळी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आपण आल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. (Offensive remarks about Uddhav Thackeray Narayan Rane ordered to appear in court on January 5)

“न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आज न्यायालयात हजर राहिलो होतो. पुढील सुनावणीसाठी न्यायालयाने 5 जानेवारी ही तारीख दिली आहे. त्यानुसार 5 जानेवारीला उपस्थित राहणार असून ही केस ही डिस्चार्ज करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे”, असे नारायण राणे यांचे वकील मानशिंदे यांनी सांगितले. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज जिल्हा न्यायालयात येणार असल्याने न्यायलायच्या आसपास कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

- Advertisement -

नेमके प्रकरण काय?

जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत (दि. 23 ऑगस्ट) तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. नारायण राणे यांना महाड न्यायालयात हजर केल्यानंतर रायगड पोलिसांकडे दोन वेळा हजेरी लावण्याचे आदेश दिले होते. मात्र 31 ऑगस्ट 2021 रोजी नारायण राणे यांनी प्रकृती ठीक नसल्याचे सांगून वकिलांमार्फत पोलीस ठाण्यात आपले म्हणणे मांडले होते. त्यानंतर 13 सप्टेंबर रोजी दुसरी हजेरीच्या वेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे त्यांचे वकील अॅड. संग्राम देसाई, अॅड. संदेश चिकणे,तत्कालीन जिल्हाध्यक्ष महेश मोहिते,अंकित बंगेरा यांच्यासाहित उपस्थित राहिले होते.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईसह कोकणात जनआशीर्वाद यात्रा काढली. या यात्रेदरम्यान २३ ऑगस्टला महाड येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याला शिवसेनेने आक्षेप घेतला होता. तसेच महाड शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर, रत्नागिरी येथील जनआशीर्वाद यात्रेत २४ ऑगस्ट रोजी राणे यांना अटक करून महाड न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे राणे यांना सशर्त जामीन मंजूर केला होता.


हेही वाचा – कॉग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रेत’ बॉलिवूडची हजेरी, ‘या’ अभिनेत्रीने घेतला सहभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -