घरताज्या घडामोडीBMC Election 2022 : प्रभाग पुनर्रचनेवर आतापर्यंत १०० हरकती व सूचना दाखल

BMC Election 2022 : प्रभाग पुनर्रचनेवर आतापर्यंत १०० हरकती व सूचना दाखल

Subscribe

सर्वपक्षीयांना प्रतिक्षा असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या प्रभाग पुनर्रचनेबाबत पालिकेने हरकती व सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार आतापर्यंत फक्त १०० हरकती व सूचना दाखल झाल्या आहेत. या हरकती व सूचनांवर निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या समितीपुढे २२ फेब्रुवारीपासून सुनावणी घेण्यात येणार असून त्याबाबतचा अहवाल २ मार्चला निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे.

सध्या मुंबईत कोविडचा संसर्ग कमी झालेला असला तरी कोविड हद्दपार झालेला नाही. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. अशा परिस्थितीत मुंबई महापालिकेचा मागील ५ वर्षांचा कालावधी येत्या ८ मार्च रोजी संपत आहे. मुंबईत यापूर्वी २२७ वार्ड होते आता लोकसंख्या वाढीनुसार त्यात आणखीन ९ नवीन वॉर्डांची भर पडून संख्या २३६ वर गेली आहे. नव्या प्रभाग रचनेचा मसुदा पालिकेच्या वेबसाईटवर १ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

- Advertisement -

प्रभाग फेररचना झाल्याने त्याबाबत पालिकेने १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागवल्या आहेत. त्यानुसार, पालिकेकडे विविध सामाजिक संस्था, राजकीय कार्यकर्ते, माजी नगरसेवक आदींकडून १०० हरकती व सूचना आल्या आहेत.
काही लोकांनी वार्डात करण्यात आलेले बदल पूर्ववत करावेत. वार्डातील काही मोजकाच भाग वगळण्यात यावा. मर्जीतील मतदार असलेला मोठा विभाग तसाच ठेवावा, आदी प्रकारच्या या हरकती व सूचना असल्याचे समजते.

प्रभाग पुनर्र्चनेबाबत हरकती व सूचनावर सुनावणी घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार अप्पर मुख्य सचिव, वित्त विभाग, कोंकण विभागीय आयुक्त, मुंबई शहर विभागाचे जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच पालिका आयुक्त यांची समिती नियुक्त केली आहे. या समितीच्या पुढे आता आलेल्या १०० व १४ फेब्रुवारीपर्यंत येणाऱ्या सूचना व हरकती यांवर सुनावणी घेण्यात येईल व त्याचा अहवाल २ मार्चला निवडणुक आयोगाला सादर केला जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : New Voters in Maharashtra 2022 : राज्यात १७ लाख नवीन मतदारांची वाढ, तर मुंबईत १ लाखांपेक्षा अधिक भर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -