घरमहाराष्ट्र10th, 12th Board Exam 2022 : दहावी, बारावीच्या परीक्षा होणार ऑफलाईन, शिक्षण...

10th, 12th Board Exam 2022 : दहावी, बारावीच्या परीक्षा होणार ऑफलाईन, शिक्षण विभागाच्या बैठकीत चर्चा

Subscribe

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक बोर्ड परीक्षा पुढे ढकलल्या होत्या तर अनेक रद्द केल्या, मात्र दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने (SSC And HSC written text) घेण्यासाठी शिक्षण विभाग चाचपणी करत आहे. यासाठी राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील विविध तज्ज्ञांकडून दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यासंदर्भात मत जाणून घेण्यात एक बैठक पार पडली. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यात आली, मात्र कोरोनास्थिती अशीच राहिली किंवा तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाल्यास दहावी, बारीवीच्या परीक्षांत काही बदल करता येईल का? लेखी परीक्षा या ऑफलाईन घेण्यासाठी कोणकोणत्या खबरदारी घ्याव्या लागतील? अथवा त्यासाठी वेगळे पर्याय देता येतील?अशा अनेक महत्वाच्या प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली. तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन शाळा अंतर्गत मूल्यमापनासाठी सज्ज असतील. यासाठी नियोजन कसा करता येईल य़ावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्य़ेमुळे मागील वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या निकालातून गुणांची टक्केवारी वाढली तरी प्रत्यक्ष गुणवत्ते संदर्भात प्रश्नचिन्हा उपस्थित होऊ लागल्याने पुढील वर्षी होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घ्याव्या अशी मागणी शिक्षक आणि शाळा, महाविद्यालय संस्थाचालकांच्या प्रतिनिधीनींनी केली.

त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षांसंदर्भात शिक्षण विभागाकडून वेळोवेळी परिस्थितीचा आढावा निर्णय जाहीर करणार असल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. राज्यात दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु सुरु करण्यात आले आहेत. मात्र परीक्षेसाठी किती तयारी झाली यावर शिक्षण विभागाने चर्चा केली. या चर्चेत दहावी, बारावीच्या परीक्षा कधी व कशा पध्दतीने घेता येतील? विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे का? लेखी परीक्षेसाठी विद्यार्थी तयार आहेत का? अशा अनेक प्रश्नांवर सविस्तर मत जाणून घेण्यात आली.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -