घरताज्या घडामोडीअरे बापरे! केस वाळवताना गच्चीतून खाली पडली अन् खिडकीत लटकली

अरे बापरे! केस वाळवताना गच्चीतून खाली पडली अन् खिडकीत लटकली

Subscribe

ळी, शिडी आणि रश्शीच्या सहाय्याने मुलीला सुखरुप खाली उतरवण्यात आले.

केसाने गळा कापला असे आपण नेहमीच म्हणत असतो पण केसाने जीव टांगणी लावला अस कोणी म्हटल तर. अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे. केसांमुळे एक मुलगी मरता मरता वाचली. केस वाळवण्यासाठी गच्चीत गेलेली मुलगी तोल जाऊन खाली पडली आणि खिडकीत लटकली. पुण्यातील या घटनेने सर्वांचीच झोप उडवली. पुण्याच्या शुक्रवार पेठेतील गणेश नगर अपार्टमेंटमध्ये १५ वर्षांची मुलगी गच्चीत केस वाळवत होती. तेव्हा तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. नशीब बलवत्तर म्हणून मुलगी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर अडकली. (15 years girl drying her hair and fell down from the floor and hung in the window in ganeshnagar shukravar peth pune ) या घटनेनंतर संपूर्ण इमारतीत एकच खळबळ उडाली. मुलीला वाचवण्यासाठी तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांना तब्बल २ तासांनी मुलीला सुखरुप खाली उतरवण्यात आले.

अग्निशमन दलाच्या जवानांना घटनेची खबर मिळताच ते त्वरित घटनास्थळी दाखल झाले. तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या मुलीला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना २ तास लागले. जाळी, शिडी आणि रश्शीच्या सहाय्याने मुलीला सुखरुप खाली उतरवण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, ते जेव्हा घटनास्थळी पोहचले तेव्हा मुलगी खूप घाबरली होती. तिचे पाय लटलट कापत होते. अत्यंत कठीण परिस्थितीत आम्ही मुलीचे प्राण वाचवले ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

मुलगी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर अडकल्यानंतर इमारतीत रहिवाश्यांनी तिला साडी आणि रश्शीच्या साहाय्याने आधार दिला. चार इंचाच्या ग्रीलवर मुलगी उभी होती. रहिवाश्यांनी मदत केली नसती तर मुलगी कोणत्याही क्षणी वरुन खाली पडली असती.

मुलगी कशी काय पडली?

एका वृत्तवाहिनीला मुलीने दिलेल्या माहितीनुसार, मुलगी सकाळी ९ वाजताच्या सुमारास इमारतीच्या गच्चीवर केस वाळवण्यासाठी आली. खाली वाकून बघत असताना तिने कट्यावर सहज पाय ठेवला होता आणि तिचा तोल जाऊन खाली पडली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर माझा पाय अडकला आणि मी तिथे थांबून राहिले. इमारतीमधील रहिवाशी असलेल्या एका व्यक्तीने मला साडी दिली आणि मी वाचले,असे तिने सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – पोलीस आयुक्तालयासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -