घरताज्या घडामोडीपाकिस्ताननंतर घाणा देशात मोठा स्फोट, १७ लोकांच्या मृत्यूसह शेकडो इमारती दुर्घटनाग्रस्त

पाकिस्ताननंतर घाणा देशात मोठा स्फोट, १७ लोकांच्या मृत्यूसह शेकडो इमारती दुर्घटनाग्रस्त

Subscribe

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना अलर्ट करण्यात आले आहे. एपिएटमध्ये १० हजार लोकं राहतात यातील सर्वाधिक नागरिक शेतकरी आणि खाणीत काम करणारे आहेत.

पाकिस्तानच्या लाहौर शहरात गुरुवारी स्फोट झाला होता. या स्फोटात ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. तर आता आफ्रिकेच्या घाणामध्ये मोठा स्फोट झाला असल्याची माहिती समोर आली आहे. उत्खननासाठी स्फोटक पदार्थ एका ट्रकमधून नेण्यात येत होते. मोटारसायकल आणि स्फोटके वाहून नेणाऱ्या ट्रकचा अपघात होऊन स्फोट झाला. या स्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला असून ५९ लोक जखमी झाले आहेत. छोटे शहरच हा स्फोटामुळे हादरुन गेले होते. शेकडो इमारतींचेही नुकसान झालं आहे. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

घाणामध्ये खाणीत उत्खनन करण्यासाठी काही स्फोटके नेण्यात येत होती. एका ट्रकमध्ये ही स्फोटके भरण्यात आली होती. परंतु प्रवासादरम्यान मोटारसायकल आणि ट्रकमध्ये अपघातात मोठा स्फोट झाला. स्फोटात जखमी झालेल्या एपिएट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये ५ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. स्फोटाची घटना राजधानी अकाराच्या पश्चिमेपासून ३०० किलोमीटर लांब असलेल्या बोगोस येथील खनन शहराजवळ एपिएटमध्ये झाला आहे.

- Advertisement -

स्फोटाच्या धमाक्यामुळे शेकडो इमारतींचे नुकसान झालं आहे. आपत्कालीन सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बचावकार्य सुरु आहे. काही लोक इमारतींमध्ये आणि घरांमध्ये अडकली आहेत. या सर्वांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

नॅशनल डिजास्टर मैनेजमेंट ऑर्गनाइजेशनचे अधिकारी जनरल सेजि एमेडोनुमध्ये धमाक्यामुळे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. ५०० पेक्षा जास्त बिल्डिंगचे नुकसान झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना अलर्ट करण्यात आले आहे. एपिएटमध्ये १० हजार लोकं राहतात यातील सर्वाधिक नागरिक शेतकरी आणि खाणीत काम करणारे आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : lakhimpur kheri violence : लखीमपूर हिंसाचार प्रकरणी यूपी पोलिसांकडून दुसरी चार्जशीट दाखल, सात शेतकरी आरोपी म्हणून घोषित

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -