घरताज्या घडामोडीOperation 'Zindagi' : बॉम्बे हायजवळ बार्ज P305 मधील आतापर्यंत १८४ जणांची सुटका

Operation ‘Zindagi’ : बॉम्बे हायजवळ बार्ज P305 मधील आतापर्यंत १८४ जणांची सुटका

Subscribe

'तौक्ते चक्रीवादळाच्या' (Cyclone Tauktae) तडाख्यात सापडलेले पी३०५ बार्जमधील आतापर्यंत १८४ जणांची सुटका करण्यात आली आहे.

‘तौक्ते चक्रीवादळाच्या’ (Cyclone Tauktae) तडाख्यात सापडलेले पी३०५ बार्ज हे जहाज बुडाल्याची घटना समोर आली. या वादळादरम्यान बॉम्बे हायजवळ डायमंड ऑईल फील्ड जवळील एका बार्ज पी३०५ मध्ये २७३ कर्मचारी अडकल्याचे वृत्त समोर आले होते. ही माहिती मिळताच नौदलाने बचाव कार्य सुरू केले. दरम्यान, सुरुवातीला १४६ कर्मचाऱ्यांची नौदलाकडून सुखरुप सुटका करण्यात आली. त्यानंतर आज नौदलाकडून इतर कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत १८४ जणांची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली असून वाचवण्याच आलेल्या कर्मचाऱ्यांना घेऊन आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता मुंबई बंदराकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, आयएनएस तेग, आयएनएस बेतवा, आयएनएस ब्यास पी८१ आणि सी किंग हेलिकॉप्टरद्वारे अजूनही बचाव कार्य सुरू आहे.

- Advertisement -

 

चक्रीवादळा दरम्यान अरबी समुद्रात बॉम्बे हाय येथे अडकलेल्या बोटींना वाचविण्यासाठी भारतीय नौदलाची मदत मागण्यात आली. त्यानंतर भारती नौदलाने आपली युद्धनौका आणि हवाई जहाज बचाव मोहिमेसाठी रवाना झाल्या. बॉम्बे हाय परिसरातील हीरा ऑईल फील्ड जवळील एका बार्ज पी३०५ मध्ये काही जण अडकल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर भारतीय नौदलाने आयएनएस कोचीच्या माध्यमातून शोध आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले. यासोबत दुसरी नौका आणि हेलिकॉप्टरची मदत घेत ऑपरेशन यशस्वी करत आतापर्यंत १८४ जणांची सुटका करण्यात आली आहे. यामुळे अनेकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

- Advertisement -

१३ जणांचे मृतदेह आढळले

बार्ज पी ३०५ वरील १३ जणांचे मृतदेह भारतीय नौदलाच्या हाती लागले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील चार जणांचे मृतदेह भारतीय नौदलाचे जवान घेऊन आल्याचे बोले जात असून इतर मृतदेह दुपारपर्यंत आणेले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


हेही वाचा – गुजरातमध्ये कमजोर सरकार असल्यानं मोदी तिथला दौरा करणार; राऊतांचा चिमटा


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -