घरमहाराष्ट्रखाजगी वाहनातून साडेपाच लाखांची रोकड जप्त

खाजगी वाहनातून साडेपाच लाखांची रोकड जप्त

Subscribe

पाचोरा येथे नियुक्त करण्यात आलेल्या पथकाने आज खाजगी वाहनातून पाच लाख पंचेचाळीस हजार रुपयांची रोख रक्कम जमा केल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकांची घोषणा केली असून निवडणूकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचे पालन होण्यासाठी तसेच या कालावधीत बेकायदेशीर कृतींना आळा घालण्यासाठी जिल्ह्यात भरारी व स्थिर सर्व्हेक्षण पथकांची नियुक्ती केली आहे. पाचोरा येथे नियुक्त करण्यात आलेल्या पथकाने आज खाजगी वाहनातून पाच लाख पंचेचाळीस हजार रुपयांची रोख रक्कम जमा केल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली आहे.

विविध पथकांची नियुक्ती

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर केला असून १० मार्चपासून जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यात आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी विविध पथकांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार पाचोरा विधानसभा मतदान संघात आचारसंहिता कालावधीत बेकायदेशीर कृतींना आळा घालण्यासाठी किशोर महाले यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकांच्या तपासणींतर्गत वाहनांची तपासणी करतांना वाहन क्रमांक एमएच १९ एपी ४४०३ वॅगनर या प्रकाराच्या वाहनातून रुपये ५ लाख ४५ हजार जप्त केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -