Maharashtra Corona Update: राज्यात सलग चौथ्या दिवशी ३५ हजार रुग्णवाढ!

mumbai and maharashtra corona update
मुंबईकरांच्या चिंतेत वाढ, मुंबईत २४ तासात ६७६ तर राज्यात १ हजार कोरोनाबाधितांची नोंद

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढ असल्यामुळे राज्य सरकारने कडक पाऊल उचलत उद्यापासून जमावबंदी लागू केली आहे. दरम्यान मागील २४ तासांत राज्यात ३५ हजार ७२६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १६६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १४ हजार ५२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २६ लाख ७३ हजार ४६१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५४ हजार ७३ जणांचा मृत्यू झाला असून २३ लाख १४ हजार ५७९ जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ३ लाख ३ हजार ४७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ९१ लाख ९२ हजार ७५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६ लाख ७३ हजार ४६१ (१३.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४ लाख ८८ हजार ७०१ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत तर १५ हजार ६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत.

राज्यात उद्या (रविवार) रात्रीपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार उद्यापासून रात्री ८ वाजल्यापासून ते पहाटे ७ वाजेपर्यंत जमावबंदी लागू होणार आहे. चौपाट्या, उद्याने, मॉल, सिनेमागृह यासाठीही सरकारने अनेक निर्बंध घातले आहे. १५ एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.


हेही वाचा – Corona Update: मुंबईकरांची चिंता वाढली! दिवसभरात आढळले ६,१२३ रुग्ण