घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये ५१ नवे करोनाबाधित

नाशिकमध्ये ५१ नवे करोनाबाधित

Subscribe

नाशिक शहरात करोनाने धुमाकूळ घातला असून, शनिवारी (दि.१३) दिवसभरात जिल्ह्यात ५१ नवे रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळून आले. यात सर्वाधिक 39 रुग्ण नाशिक शहरातील, तर 11 रुग्ण नाशिक ग्रामीणमधील आहेत. शनिवारी दिवसभरात ३ बाधितांचा मृत्यू झाला. यात शहरातील एक व नाशिक ग्रामीणमधील दोघांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १ हजार ८६८ वर गेली असून, एकट्या नाशिक शहरात 607 बाधित रूग्ण आहेत.

मालेगावात करोनाबाधित रूग्णांची संख्या घटली असल्याने आरोग्य विभागास दिलासा मिळाला असताना आता नाशिक शहरासह जिल्ह्यात करोनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासनास दिवसभरात तीन टप्प्यात पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. पहिल्या टप्प्यात ११ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नाशिक शहर ४, येवला ५, दोडी (ता.सिन्नर), लाखलगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दुसर्‍या टप्प्यात नाशिक शहरात १२ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले तर तिसर्‍या टप्प्यात २३ नवे रूग्ण बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात १ हजार ८६८ रूग्ण बाधित असून सध्या ४९८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील १ हजार २२९ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण २२८, नाशिक शहर २२२, मालेगाव ७२९, जिल्ह्याबाहेरील रूग्ण ५० आहेत.

- Advertisement -

२६५ संशयित रूग्ण दाखल

जिल्हा रूग्णालय २३, नाशिक महापालिका रूग्णालये १३९, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय ५, मालेगाव महापालिका रूग्णालये ५, नाशिक ग्रामीण रूग्णालय ९३ रूग्णांचा समावेश आहे.

३८९ अहवाल प्रलंबित
१४ हजार ८४९ संशयित रूग्णांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले. यामध्ये १ हजार ८४५ रूग्ण पॉझिटिव्ह, १२ हजार ६१५ रूग्ण निगेटिव्ह असून ३८९ रूग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. प्रलंबित रूग्णांमध्ये नाशिक ग्रामीण ८५, नाशिक शहर १२५, मालेगाव १७९ रूग्णांचा समावेश आहे.

- Advertisement -

नाशिक शहरात रूग्ण असे…

फुलेनगर, पेठ रोड ३, कथडा, जुने नाशिक २, गंजमाळ, नाशिक १, वडाळा रोड १, पेठ रोड १, मायको रूग्णालय, कालिकानगर २, चौक मंडई १, मायको सर्कल, दिंडोरी रोड १, जेलरोड १, हनुमानवाडी १, जुने नाशिक १, इंदिरानगर १, रविवार कारंजा १, खडकाळी ३, नवरंग कार्यालय, दिंडोरी रोड २, पेठ रोड १, पखाल रोड 1, अशोकनगर 1, भाभानगर 1, सारडा सर्कल 1, खडकाळी 1, रोहिणीनगर, पेठरोड 2, त्र्यंबक गेट, नाशिक 1, जुने नाशिक 1)

नाशिक करोना अपडेट

पॉझिटिव्ह रूग्ण-१८68 (मृत-११८)
नाशिक शहर-607 (मृत-३०)
नाशिक ग्रामीण-३१९ (मृत-१६)
मालेगाव शहर-८७० (मृत-६४)
जिल्ह्याबाहेरील-७२ (मृत-८)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -