घरताज्या घडामोडीराज्यात गुरुवारी कोरोना बाधितांचे ५ हजार २१८ नवे रुग्ण

राज्यात गुरुवारी कोरोना बाधितांचे ५ हजार २१८ नवे रुग्ण

Subscribe

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच आजा राज्यात कोरोना बाधितांच्या रुग्णांचा आकडा ५ हजार पार गेला आहे. त्यानुसार, राज्यात ५ हजार २१८ रुग्ण आढळले आहेत. तसेच, मुंबईत सर्वाधिक म्हणजे २४७९ रुग्णांची भर पडली आहे.

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच आजा राज्यात (maharashtra) कोरोना बाधितांच्या रुग्णांचा आकडा ५ हजार पार गेला आहे. त्यानुसार, राज्यात ५ हजार २१८ रुग्ण आढळले आहेत. तसेच, मुंबईत सर्वाधिक म्हणजे २४७९ रुग्णांची भर पडली आहे. याशिवाय, आज दिवसभरात एकूण ४ हजार ९८९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. (5218 new cases in maharashtra on thursday 4989 patients discharged today)

राज्यामध्ये ७७,७७,४८० कोरोनाबाधित बरे

- Advertisement -

राज्याच्या कोरोना प्रकरणाच्या माहितीनुसार, आज राज्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा १.८६ टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये ७७,७७,४८० कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८३ टक्के इतके झाले आहे.

२४,८६७ सक्रिय रुग्ण

- Advertisement -

राज्यात आज एकूण २४,८६७ सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे १३ हजार ६१४ इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये ५४८८ सक्रिय रुग्ण आहेत.

याशिवाय, आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, मागील २४ तासांत कोरोनाचे १३ हजार ३१३ नवीन रुग्ण आढळले आहेत. तसेच, १०,९७२ लोक या आजारातून बरे झाले आहेत. तर ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ८३ हजारांहून अधिक म्हणजेच ८३ हजार ९९० ने वाढली आहे. याआधी २२ जून रोजी देशभरात कोरोना संसर्गाची १२ हजार २४९ नवीन रुग्णसंख्या नोंदवण्यात आली होती. तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – भाजपने टाकले सत्ता स्थापनेच्या दिशेने पहिले पाऊल, बहुमत ठरावावेळी होणार फायदा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -