घरताज्या घडामोडीCorona : साताऱ्यात ६० कोरोनाबाधितांची वाढ; तर एकाचा मृत्यू

Corona : साताऱ्यात ६० कोरोनाबाधितांची वाढ; तर एकाचा मृत्यू

Subscribe

साताऱ्यात ६० कोरोनाबाधितांची वाढ.

एकीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असताना दुसरीकडे मात्र, सातारा जिल्ह्यात ६० कोरोनाबाधित आढळून आले आहे. तर एकाच कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. साताऱ्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत ५४ हजार ४५४ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर १०५ जणांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने सोमवारी रात्री जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ६४ नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे.

६४ नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह

साताऱ्यात सोमवारी रात्री जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ६४ नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे. यामध्ये सातारा शहराबरोबरच तालुक्यातीलही काही गावांचा समावेश आहे. कऱ्हाड शहराबरोबरच तालुक्यातील वाघोरी, माण, खटाव, पाटण, कोरेगाव याठिकाणी देखील कोरोनाबाधितांचा समावेश आहे.

- Advertisement -

एकाचा मृत्यू

सातारा जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरेगाव तालुक्यातील एका ८० वर्षांच्या वृद्धेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना बळींची संख्या १ हजार ८३१ वर जाऊन पोहोचली आहे.

३३९ जणांचे नमुने तपासणीला

साताऱ्या जिल्ह्यात कोरोनाच्या संशयावरुन एकूण ३३९ जणांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील २५, कऱ्हाड २०, कोरेगाव १०, वाई ४१, खंडाळा १, रायगाव येथील ३६, पानमळेवाडी १०७, महाबळेश्वर १०, दहीवडी २४, म्हसवड १५. पिंपोडे ६ आणि कऱ्हाडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील ४४ जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – जय महाराष्ट्र ! शिवसैनिकांनो आता लढाई रस्त्यावर राहिलेली नाही


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -