घरताज्या घडामोडीपुणे : दिवसभरात ७२५ रुग्णांची नोंद; तर १६ जणांचा मृत्यू

पुणे : दिवसभरात ७२५ रुग्णांची नोंद; तर १६ जणांचा मृत्यू

Subscribe

पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज दिवसभरात नव्याने ७२५ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या १८ हजार २४० वर गेली आहे.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज दिवसभरात नव्याने ७२५ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या १८ हजार २४० वर गेली आहे. तर १६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. तर पुण्यात आतापर्यंत ६५५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात सलग दोन दिवस पाचशे पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळल्याने पुणेकरांची चिंता अधिक वाढली आहे.

- Advertisement -

२०२ रुग्ण झाले बरे

दरम्यान, कोरोनावर उपचार घेणाऱ्या २०२ रुग्णांची तब्येत व्यवस्थित असल्याने त्या सर्वांना आज घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर एकूण ८ हजार ३०२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी – चिंचवडमध्ये १३४ करोनाबाधित रुग्णांची भर

पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भाग मिळून आज नव्याने १३४ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर ३ जणांचा मृत्यू देखील झाला आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ हजार २६२ वर पोहचली असून आज ७४ जण कोरोनामुक्त झालेले आहेत. आत्तापर्यंत १ हजार ४६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकूण मृत्यूची संख्या ६५ वर पोहचली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पुणे : लॉकडाऊनच्या नैराश्यातून हॉटेल व्यवसायकाची आत्महत्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -