घरठाणेthane18 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त - मुख्यमंत्री

18 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त – मुख्यमंत्री

Subscribe

ठाणे : ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील 18 रुग्णांचा मृत्यू प्रकरणावर आरोग्य संचालकांच्या अध्यक्षेखाली समिती नेमली, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ठाण्याच्या रुग्णालयात घडलेली घटना ही दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला योग्य त्या सूचना दिल्याचे देखील माध्यमांशी बोलताना दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मी आज सकाळी दुर्दैवी घटनेची माहिती आयुक्तांकडून घेतली आहे. आणि आरोग्य विभागाला सूचना देखील दिलेल्या आहेत. आमचे मंत्री दीपक केसरकर हे देखील त्याठिकाणी पोहोचले असतील. आरोग्य मंत्री आणि आरोग्य सचिव यांच्याशी देखील बोलणे झाले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी सातत्याने संपर्कात होते. हे रुग्ण वेगवेगळ्या दिवशी दाखल झाले होते. एक आरोग्य संचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमली आहे. यातून जो अहवाल येईल, त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. ठाण्याच्या रुग्णालयात झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेची दखल सरकारने गांभीर्याने घेतली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ठाण्याच्या रुग्णालयातील 18 रुग्णांच्या मृत्यूवर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

अहवालानंतर दोषींवर कारवाई होईल

दोन दिवसांपूर्वी देखील पाच जणांचा मृत्यू याच रुग्णालयात झाला, या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, “यासंदर्भात आयुक्तांनी मला वस्तुस्थिती सांगितली की, रुग्णालयात वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण आले होते. काही रुग्ण हे खासगी रुग्णालयातून देखील आले होते. या रुग्णांची रुग्णालयात दाखल होताना अत्यंत वाईट अवस्था होती. या सर्व गोष्टी माझ्यापर्यंत आल्या असल्या तरी ही घटना दुर्दैवी आहे. या घटनेची सखोल चौकशी होईल आणि अहवालानंतर दोषींवर करवाई करण्यात येईल,” असे आश्वास मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Thane : कळवा रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू; डीन राकेश बारोट यांनी दिलं स्पष्टीकरण

लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे…

‘दोन दिवसांत अहवाल आल्यानर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल’, अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शहरातील ही घटना आहे, पत्रकारांच्या प्रश्नावर तानाजी सावंत म्हणाले, “मुख्यमंत्र्यांच्या शहरात, गडचिरोली किंवा चंद्रपूरात हे सर्व महाराष्ट्राचे नागरीक आहेत. लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे महाराष्ट्र शासनाचे प्रथम कर्तव्य आहे. एखादी घटना कोणत्या भागात घडली ही वेळी गोष्ट आहे. दुर्गम भागात जरी एखादी घटना घडली तरी ती शासनाची जबाबदारी आहे. राज्य सरकार जबाबदारीपासून पळ काढत नाही. हे कशामुळे झाले, दोन दिवसात अहवाल येईल, ज्यामुळे ही घटना घडली त्यावर योग्यती कारवाई केली जाईल.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -