Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र पुण्यातील कोरोना निर्बंध शिथिलतेबाबत सोमवारी निर्णय होणार - उपमुख्यमंत्री

पुण्यातील कोरोना निर्बंध शिथिलतेबाबत सोमवारी निर्णय होणार – उपमुख्यमंत्री

Related Story

- Advertisement -

पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही या पाश्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांमध्ये कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण ५ टक्के किंवा ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. परंतु पुण्यातील ग्रामीण भागात अद्याप हे प्रमाण १२ ते १३ टक्के इतके आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाचे सरासरी प्रमाण बघता अजूनही जास्त आहे. आज पुणे आणि पिंपरी चिंचवड याबद्दल वेगळा निर्णय घेण्यात आला, कारण तेथील कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण ५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे तिथे शिथिलच्या संदर्भातील वेगळ धोरण सोमवारी त्याबद्दलचा निर्णय घेणार असल्याचे अजिर पवार यांनी सांगितले. या निर्णयानुसार, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अंमलबजावणी करण्याचे आजच्या बैठकीत ठरवण्यात आले आहे.

तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज

कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान तिसऱ्या लाटेचं संकट येऊ नये, परंतु जर कोरोनाचं संकट आलंच तर राज्यात कोणतेही कमतरता राहू नये, यासाठीचे नियोजन गेल्या काही दिवसांपूर्वीच सुरू केले आहे. आज झालेल्या आढावा बैठकीत यासंदर्भातील चर्चादेखील करण्यात आली. दरम्यान, कोरोनासंदर्भातील ज्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत, त्याप्रकारचे काम प्रशासनाचे काम सुरू असल्याचे उपमुख्यांनी सांगितले.

- Advertisement -

यावेळी ब्लॅकफंगसवरील इंजेक्शनच्या कमतरतेबद्दल देखील त्यांनी भाष्य केलं. यावेळी ते असे म्हणाले की, ब्लॅकफंगसवरील इंजेक्शनची बिलं प्रचंड मोठी येत होती, हे लक्षात घेता शुक्रवारी राज्य सरकारने नवे आदेश जारी केले आहे. यानुसार ब्लॅकफंगसवरील उपचार सरकारी रूग्णालयात करायचे झाले तर ते पूर्णतः मोफत करण्यात येणार आहे तर खाजगी रूग्णालयात करायचे झाले तर त्यांनी कसे बिल लावावे, याबद्दलचे आदेशी जारी करण्यात आले आहेत. हे आदेश जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


- Advertisement -