घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरडॉक्टरची एक चूक आणि अवैध गर्भपाताचा पर्दाफाश, औरंगाबादमध्ये दाम्पत्यावर गुन्हा

डॉक्टरची एक चूक आणि अवैध गर्भपाताचा पर्दाफाश, औरंगाबादमध्ये दाम्पत्यावर गुन्हा

Subscribe

Illegal Abortion | शासकीय रुग्णालयाला याबाबत माहिती मिळताच त्यांनी याप्रकरणी बिडकीन पोलिसांत माहिती दिली. त्यामुळे हा काळाधंदा उजेडात येऊ शकला.

Illegal Abortion | औरंगाबाद – महिलांचा अवैधरित्या गर्भपात होत असल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादच्या पैठण तालुक्यातून समोर आला आहे. डॉक्टर दाम्पत्याकडून हे बेकायदा कृत्ये सुरू असतानाही आरोग्य विभागाला याची कुणकूण लागली नव्हती. मात्र, या डॉक्टर जोडगोळीने केलेल्या एका गर्भापातामुळे महिलेची प्रकृती बिघडली. तिच्यावर उपचार करण्यासाठी तिला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली असून या प्रकारामुळे २०१२ साली परळी येथे झालेल्या मुंडे गर्भपात प्रकराची पुनरावृत्ती झाल्याचं म्हटलं जातंय.

हेही वाचा – कर्मकांडाला फाटा : ८३ वर्षीय आजीचे मरणोत्तर देहदान

- Advertisement -

अमोल जाधव आणि सोनाली जाधव असे या डॉक्टर दाम्पत्याचे नाव आहे. त्यांचे चितेगाव येथील पांगरा रोडवर औरंगाबाद स्त्री रुग्णालय नावाचे एक रुग्णालय आहे. या रुग्णालयातच या दाम्पत्याकडून गर्भपात केले जात होते. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू असूनही आरोग्य विभागाला याची कुणकूण लागली नव्हती. मात्र, २ फेब्रुवारीला एका महिलेचा गर्भपात या दाम्पत्याने केला. कोणताही शासकीय परवाना नसताना त्यांनी गर्भपात केला. मात्र, शस्त्रक्रिया करताना महिलेची प्रकृती बिघडली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. त्यामुळे या महिलेला औरंगाबादेत एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, या महिलेची प्रकृती नाजूक असल्याने खासगी रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिला. त्यानंतर, जाधव दाम्पत्याने या महिलेला एका शासकीय रुग्णालयात दाखल केले आणि ते फरार झाले. शासकीय रुग्णालयाला याबाबत माहिती मिळताच त्यांनी याप्रकरणी बिडकीन पोलिसांत माहिती दिली. त्यामुळे हा काळाधंदा उजेडात येऊ शकला.

पोलिसांनी अमोल जाधव आणि सोनाली जाधव या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे. तसंच, त्यांच्या रुग्णालयाचीही झाडाझडती घेतली आहे. यावेळी पोलिसांनी गर्भपात करण्याचे साहित्य जप्त केले. तसंच, सरकारने बंदी घातलेले औषधेही येथे सापडले आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्याकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मालेगाव : महिलेचे तुकडे करून मारून टाकणारा ताब्यात; धक्कादायक कारण आले समोर

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -