घरताज्या घडामोडीमुलीच्या अल्पवयीन मैत्रिणीवर वडिलांचे लैंगिक अत्याचार, मुलगी गर्भवती!

मुलीच्या अल्पवयीन मैत्रिणीवर वडिलांचे लैंगिक अत्याचार, मुलगी गर्भवती!

Subscribe

योगेश धोतरे असं या अरोपीचं नाव आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला.

चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूरमधील चिमुर तालुक्यात हा प्रकार घडला आहे. वडिलांनी आपल्या मुलीच्या अल्पवयीन मैत्रीणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. योगेश धोतरे असं या अरोपीचं नाव आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला.

पीडित मुलीची आरोपीच्या मुलीशी चांगली मैत्री होती. त्यामुळे ही पीडित मुलगी मैत्रीणीच्या घरी नेहमी अभ्यासासाठी येत असे. त्यामुळे तीची आपसूकच मैत्रिणीच्या वडिलांशी ओळख झाली. आरोपीने याच गोष्टीचा फायदा घेतला आणि तीच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि याबद्दल बाहेर वाच्चता केल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेने कोणालाच याबद्दल काही सांगितले नाही. याचाच फायदा आरोपीने घेतला आणि तीच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले.

- Advertisement -

एकेदिवशी मुलीच्या आईच्या हा प्रकार लक्षात आला. मुलीचं वारंवार पोट दुखत असल्याने तीची आईने डॉक्टरांकडे घेऊन गेली. त्यावेळी मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं. यामुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. अखेर मुलीची चौकशी केली असता तीने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. यानंतर कुटुंबाने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी योगेश दोहतरे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हे ही वाचा- कोल्हापुरला दगावलेला रुग्ण करोनाग्रस्त नाही

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -