नाशिक शहरातील द्वारका चौक येथील झोपडपट्टीत भीषण आग

नाशिक : शहरातील द्वारका परिसरातील संतकबीर नगर झोपडपट्टीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. एकघरात लागलेल्या आगीनंतर ती आग आजुबाजूच्या घरांमध्ये शिरली. आणि लागोपाठ ५ सिलेंडरचा स्फोट झाला. झोपडपट्टी आणि अतिशय चिवळ भाग असल्याने अग्निशामक दलाला आग विझवताना मोठ्या अडचणीना सामना करावा लागला. या स्फोटात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तसेच या आगीत आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दल, केंद्रीय सुरक्षा दल, खाजगी उद्योग समुहाच्या अश्या तब्बल १० ते १२ अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच झोपडपट्टी भरगच्च असल्यामुळे तब्बल २ तसहून अधिक वेळ अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होता. या घटनेत १० ते १२ झोपड्या पुर्णपणे जाळून खाक झाल्या आहेत.