घरCORONA UPDATECoronavirus : कोरोना रुग्णांसाठी पालिकेकडे सोपवलं खासगी रुग्णालय; मनसेच्या राजू पाटील यांची...

Coronavirus : कोरोना रुग्णांसाठी पालिकेकडे सोपवलं खासगी रुग्णालय; मनसेच्या राजू पाटील यांची उत्तम कामगिरी

Subscribe

मनसे आमदार राजू पाटील यांनी आपलं खासगी रुग्णालय कल्याण डोबिंवली महापालिकेच्या ताब्यात दिलं आहे. राजू पाटील यांच्या निर्णयाचं सगळीकडून कौतुक केलं जात आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु असून परिस्थिती अद्यापही नियंत्रणात नसल्याने लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारसोबत लोकप्रतिनिधीदेखील आपापल्या मतदारसंघात मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. याच पार्श्वभुमीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी आपलं खासगी रुग्णालय कल्याण डोबिंवली महापालिकेच्या ताब्यात दिलं आहे. राजू पाटील यांच्या निर्णयाचं सगळीकडून कौतुक केलं जात आहे.

राजू पाटील यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “कल्याण डोंबिवलीत पहिला COVID + रूग्ण सापडल्यानंतर आयुक्तांना डोंबिवलीतील एखादा खासगी दवाखाना फक्त कोविड-१९ साठी घ्यावा, अशी सूचना केली होती. आवश्यकता वाटल्यास आमचे आरआर हॉस्पिटल तात्पुरते ताब्यात देण्याची तयारी दाखवली होती. ती मान्य झाली. येथे IMA च्या डॉक्टरांचे सहाय्य घेऊन उपचार केले जातील”. राजू पाटील यांच्या आर. आर. रुग्णालयात १५ ते २० व्हेंटिलेटर तसंच १०० बेड आहेत. राजू पाटील यांच्या निर्णयाचं सगळीकडून कौतुक होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -