घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रलोणावळ्यात सहलीसाठी गेले आणि स्वीमिंग पूलमध्ये बुडून झाला चिमुकल्याचा अंत

लोणावळ्यात सहलीसाठी गेले आणि स्वीमिंग पूलमध्ये बुडून झाला चिमुकल्याचा अंत

Subscribe

वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल पवार कुटुंब शोकसागरात बुडाले

नाशिक : आपल्या जुळ्या मुलांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन लोणावळ्यात करण्याची इच्छा नाशिकच्या एका कुटुंबाला झाली. मात्र, नियतीने त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ दिली नाही. वाढदिवसाच्या जंगी सेलिब्रेशनसाठी हे कुटुंब नाशकातून १३ जुलैला लोणावळ्यात दाखल झाले. मात्र, १४ तारखेला लहानग्याच्या वाढदिवशीच त्याचा स्विमींग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

नाशिकात वास्तव्यास असलेल्या अखिल पवार व कुटुंबीयांनी मुलांच्या वाढदिवस सेलिब्रेशनसाठी तीन दिवसांकरीता लोणावळ्यात व्हिला बूक केला. वाढदिवसासोबतच सर्व आप्त, नातलगांचे मिळून गेट टुगेदर करण्याचा त्यांचा मानस होता. त्यानुसार ते १३ जुलैला लोणावळ्यात नियोजित व्हिलावर दाखल झाले. मात्र, दुसर्‍या दिवशी त्यांची बहीण आणि अन्य नातलग या व्हिलावर दाखल झाले. तेव्हा अखिल पवार हे त्यांना घेण्यासाठी रिसेप्शनवर पोहोचले. यावेळी रिसेप्शनवर त्यांना आलेल्या सर्व नातलगांची माहिती नमूद करणारा फॉर्म भरण्यास सांगण्यात आले, शिवाय व्हिलाची भाडेशुल्क रक्कमही जमा करण्यास सांगण्यात आले. परंतु, ही सर्व प्रक्रिया करत असताना त्यांच्या भाचीने त्यांच्या दोन वर्षाच्या मुलाला वडिलांकडे पाठवले. परंतु, हा चिमुकला बाहेरच्या दिशेला गेला, जेथे स्विमिंग पूल होता आणि त्यात खेळण्या होत्या. ज्याकडे हा चिमुकला आकर्षित झाला. हे सर्व घडत असताना बाहेर तुरळक पाऊस पडत असल्याने जागा निसरडी होऊन हा चिमुकला थेट स्विमिंग पूलमध्ये पडला. यादरम्यान कोणीही त्याच्याकडे लक्ष न दिल्याने जवळपास
१५ मिनिटे धडपड केल्यावर या चिमुकल्याने प्राण सोडले.

- Advertisement -

अखेर तो पाण्यावर तरंगल्यावर कुटुंबियांसह हॉटेल कर्मचार्‍यांना ही बाब समजली. त्यांनी तातडीने चिमुकल्याला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. शिवबा अखिल पवार (वय २) असे या घटनेत मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. हा संपूर्ण प्रकार व्हिलातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. या घटनेने पवार कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

शुभेच्छांचा वर्षाव करायला आले अन्

नाशिकमध्ये राहणारे पवार कुटुंबीय आपल्या जुळ्या मुलांचा हा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणार या आनंदात तयारी करत होते. त्यासाठी आदल्याच दिवशी लोणावळ्यातील व्हिलात दाखल झाले होते. मात्र, त्यांच्या दोनवर्षीय शिवबावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी कुटुंबीय, मित्र आणि आप्तेष्ट दाखल झाले आणि ही दुर्घटना घडल्याने सर्वजण शोकसागरात बुडाले. अत्यंत आनंदाचा हा दिवस त्यांच्यासाठी सर्वात दुखद ठरला.

.. तर टळली असती दुर्घटना

शिवबा खेळत असताना मी नातलगांची माहिती फॉर्मवर भरून देत होतो. ही प्रक्रिया सुरू असताना मला पैसेही लागलीच भरण्यास सांगण्यात आले. त्यावरून आमचे बोलणे सुरू होते. यादरम्यानच माझ्या अगदी पाठीमागे असलेल्या स्विमिंग पूलकडे शिवबा खेळण्या बघून गेला. परंतु, येथे काम करणारी महिला, तथा अन्य काही कर्मचार्‍यांनी त्याला पाहिले. मात्र हटकले नाही किंवा आम्हालाही सांगितले नाही. मी सर्व प्रक्रिया पूर्ण करून पैसे भरेपर्यंत शिवबा बुडाला होता. ही आम्हा कुटुंबियांसाठी अत्यंत वेदनादायी बाब असून, पालकांनी आपल्या पाल्यांची काळजी घेणे, क़ुणालाही धोकादायक ठिकाणाकडे लहानगे जाताना दिसले तर हटकावे एवढेच आवाहन मी करेल. : अखिल पवार, शिवबाचे वडील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -