घरमहाराष्ट्रभाजप आता व्हिडीओ बनवणारी कंपनी; सत्येंद्र जैन व्हिडीओ प्रकरणावर अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल

भाजप आता व्हिडीओ बनवणारी कंपनी; सत्येंद्र जैन व्हिडीओ प्रकरणावर अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल

Subscribe

गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. या निवडणुकांमध्ये भाजप आम आदमी पक्षाचे तिहार तुरुंगातील नेत सत्येंद्र जैन यांच्या नवनव्या व्हिडीओ जाहीर करत त्यांना लक्ष्य करत आहे. यात गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल गुजरातला पोहचले आहेत. या प्रचारादरम्यान केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि भाजपवर टीकास्त्र डागले आहे. भाजपने दिल्लीत हमी दिली की, ते प्रत्येक प्रभागात व्हिडीओचे दुकान उघडतील. भाजप आता व्हिडीओ बनवणारी कंपनी बनली आहे. व्हिडीओ बनवायची कंपनी हवी आहे की सरकार चांगलं चालवायचं आणि मुलांचं भविष्य घडवायचं हे दिल्लीतील जनता ठरवेल.

यानंतर अरविंद केजरीवाल गुजरात विधानसभा निवडणुकीवर म्हणाले की, तुम्ही रस्त्यावर उतरा. जनतेला विचारा, ते कोणाला मत देणार? ते एकतर भाजप किंवा आम आदमी पक्ष असं म्हणतात. भाजप म्हणणाऱ्या लोकांशी बोला, मग 5 मिनिटांच्या सामान्य संभाषणानंतर ती व्यक्ती म्हणते की, माझा संपूर्ण परिसर झाडूला मतदान करतो. मीही झाडूला मत देतो, पण मला भाजपची भीती वाटते. जेवढे लोक भाजपला मत देतात त्यांच्याशी बोला आणि तुम्हालाही तेच निकाल मिळेल.

- Advertisement -

केजरीवाल पुढे म्हणाले की, आपण प्रथमच असे राज्य पाहत आहोत की, जिथे एक सामान्य माणूस घाबरतो की, मी कोणाला मतदान करतो? सामान्य माणूस घाबरला आहे. शोध घेऊनही काँग्रेसचा मतदार सापडत नाही. भाजपचे मतदार मोठ्या संख्येने आम आदमी पक्षाला मतदान करणार आहेत. संपूर्ण गुजरात यावेळी बदलाची मागणी करत आहे.

राजकारणातील माझे भाकीत खरे ठरतात असे अनेकजण सांगत आहेत. दिल्ली निवडणुकीत काँग्रेसला शून्य जागा मिळण्याचा अंदाज मी व्यक्त केला होता. बरोबर आहे… पंजाबबद्दल मी जे काही भाकीत केले होते ते खरे ठरले. आज मी एक भविष्यवाणी करणार आहे. ती म्हणजे गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होणार हा माझा अंदाज आहे.

- Advertisement -

पेन्शन योजनेबाबत केजरीवाल म्हणाले की, मी गुजरातमधील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आश्वासन देऊ इच्छितो की, आमचे सरकार स्थापन झाल्यास 31 जानेवारीपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अधिसूचना जारी केली जाईल. मी हवेत बोलत नाही. पंजाबमध्ये AAP ने जुनी पेन्शन योजना लागू करण्याची अधिसूचना दिली आहे. मी सर्व प्रकारच्या सरकारी कर्मचाऱ्यांना विनंती करतो की पोस्टल बॅलेटमधील प्रत्येक मत आम आदमी पार्टीला गेले पाहिजे. तुम्हाला जमेल तसा प्रचार करा आणि लोकांना आम आदमी पक्षाला मत देण्यास सांगा. तुम्ही आमचे सरकार बनवा, आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की, आम्ही तुमचे सर्व प्रश्न सोडवू.


मोदींप्रमाणे उद्धव ठाकरेंनाही दरवर्षी राखी पाठवते; भावना गवळींचं प्रत्युत्तर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -