घरताज्या घडामोडीपुणे गुन्हेगारांचा अड्डा होतोय का?, 7 वर्षीय मुलीचं अपहरण अन् लैंगिक शोषण

पुणे गुन्हेगारांचा अड्डा होतोय का?, 7 वर्षीय मुलीचं अपहरण अन् लैंगिक शोषण

Subscribe

मागील काही दिवसांपासून पुण्यात धक्कादायक घटना घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील गुलटेकडी या परिसरात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. मात्र, आज(बुधवार) पुन्हा एकदा अशाच एका घटनेची पुनरावृत्ति पुण्यात झाली आहे. एका 7 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं. वारंवार घडत असलेल्या या घटनेंमुळे पुणे गुन्हेगारांचा अड्डा होतोय का?, असा सवाल उपस्थित होत आहे.

चहाविक्री करणाऱ्या आपल्या बाबांना ही अल्पवयीन मुलगी जेवणाचा डबा द्यायला जात होती. बाबांना डबा देऊन ती पुन्हा घरी परतत होती. त्यावेळी एका अज्ञात आरोपीने त्या मुलीचं अपहरण केलं. अपहरण करून तिला नराधमानं पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहा जवळ असलेल्या एका खोलीत घेऊन गेला. त्यानंतर याच खोलीमध्ये आरोपीने तिच्यावर हैवानी कृत्य करण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

दरम्यान, या धक्कादायक घटनेची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या घटनेचा तपास करत आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार आता पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखील पडताळणी केली आहे. त्यामुळे लवकरच पोलीस आरोपीला अटक करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून वारंवार अत्याचार ; आरोपीला अटक

- Advertisement -

8 ऑगस्ट रोजी अशीच एक घटना पुण्यातील गुलटेकडी परिसरात घडली होती. १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत शेजाऱ्याकडून वारंवार बलात्कार केला जात होता. या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी स्वागरेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता.

तक्रारीनुसार, पीडित मुलगी 19 फेब्रुवारी रोजी शाळेत शिवजयंतीनिमित्त आयोजित नाटकात सहभागी झाली होती. यावेळी कार्यक्रम संपवून ती घरी आली आणि नेहमीप्रमाणे घरात कपडे बदल होती. यावेळी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपी घरात घुसला आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. इतकेच नाही तर पीडितेचे अपहरण करून तिला मुंबईत पळवून आणल्याचीही धक्कादायक माहिती देखील समोर आली होती. महेश मोरे असं या आरोपीचे नाव आहे. तसेच तो पीडितेच्या अगदी बाजूला राहणारा होता. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करुन गुन्हा दाखल केला. तसेच या प्रकरणाचा तपास आता स्वारगेट पोलीस करत आहेत.


हेही वाचा : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील २१४ कैद्यांना करणार जेलमुक्त


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -