घरक्राइम२० लाखांची लाच मागणाऱ्या मोनोरेलचे चीफ ऑपरेटिंग ऑफीसरविरोधात ACB कडून गुन्हा दाखल

२० लाखांची लाच मागणाऱ्या मोनोरेलचे चीफ ऑपरेटिंग ऑफीसरविरोधात ACB कडून गुन्हा दाखल

Subscribe

थकीत बिल मंजूर करण्यासाठी २० लाख रुपये लाच मागणारे मुंबई मोनोरेलचे चीफ ऑपरेटिंग ऑफीसर डॉ. डी. एल. एन. मूर्ती (Chief Operating Officer of Mumbai Monorail Dr. D N L Murthy) यांच्याविरोधात एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. हाऊस किपिंगसह विविध कामाचे बिल मंजूर करण्यासाठी २० लाख रुपयांची लाच मागितली होती. फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीच्या तक्रारीवरुन एसीबीने गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी फॅसीलीटी मॅनेजमेंटची कंपनी असुन, नमुद कंपनीला Mumbai Monorail या प्रकल्पाअंतर्गत साफसफाई, हाउसकिपींग, मेंटनन्स, कस्टमर सर्व्हिस असोशीएट संबंधाने, जानेवारी २०१९ ते ऑगस्ट २०२० पर्यंतचे कंत्राट मिळालेले होते, सदरचे काम त्यांनी ऑगस्ट २०२० रोजी कंत्राटाप्रमाणे पुर्ण केले असून, नमुद कामाचे देयक (बिल/पेमेंट) दोन कोटी पन्नास लाख आणि ३२ लाख बॅक गॅरंटी असे कंपनीस मिळणे प्रलंबित होते, वारंवार प्रयत्न करून फेब्रुवारी-मार्च २०२१ मध्ये त्यांचे कंपनीस रूपये २ कोटी १० लाख आणि जुन २०२१ मध्ये २२ लाख बॅक गॅरंटीची रक्कम असे Mumbai Monorail तर्फे अदा करण्यात आली होती. परंतु अदयाप ४० लाख रूपये आणि११ लाख बॅक गॅरन्टीची रक्कम Mumbai Monorail कडे प्रलंबित आहेत.

- Advertisement -

दरम्यान, उर्वरित बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी मुंबई मोनोरेलचे चीफ ऑपरेटिंग ऑफीसर डॉ. डी. एन. मूर्ती यांनी २० लाख रुपयांची लाट मागितली. त्यामुळे एसीबीने मुर्ती यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

MMRDA ने दिली प्रतिक्रिया

एसीबीकडून आम्हाला या प्रकरणाची माहिती आलेली नाही. दरम्यान, अधिकृत पत्राची वाट न पाहता प्रशासकीय प्रक्रिया वेगाने सुरू केल्या आहेत. MMRDA अशा कृत्यांकडे अत्यंत गांभिर्याने लक्ष देते. संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांना वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आणि लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यासाठी आवश्यक ते निर्देश देण्यात आले आहेत, असं MMRDA ने म्हटलं आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -