Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी अंत्यविधीला जाणार्‍या दाम्पत्यावर काळाचा घाला

अंत्यविधीला जाणार्‍या दाम्पत्यावर काळाचा घाला

मुंबई-आग्रा महामामार्गावर भीषण अपघात; दोघे जागीच ठार

Related Story

- Advertisement -

नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जाणार्‍या दाम्पत्यावर काळाने घाला घातला. मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (दि.१) दुपारी १२ वाजेदरम्यान विल्होळी गावाजवळील डोंगरबाबा मंदिराजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात विल्होळी गावातील आशासेविकेसह एकाचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

उषा रामदास गडाख (वय ३२, दोघेही रा,विल्होळी, ता.जि.नाशिक), रामदास सोपान गडाख (व ४०) असे अपघात ठार झालेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, मुबंईकडून नाशिकच्या दिशेने भरधाव ट्रक(एमएच १५-एचजी ३६७२) येत होता. विल्होळीतील डोंगरबाबा मंदिराजवळ ट्रकचालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. भरधाव ट्रकने जोरदार दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी ट्रकच्या पुढील चाकाखाली आल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच नाशिक तालुका पोलीस घटनास्थळी आले. पोलीस निरीक्षक टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखली सहायक पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस हवालदार संजय सांगळे, पोलीस नाईक रवींद्र मलले, ज्ञानेश्वर घोडे यांनी मदतकार्य सुरु केले. तसेच, विल्होळी ग्रामस्थांनी अपघातस्थळी मदतकार्य सुरु केल्याने महामार्गावरील वाहतूक सुरुळीत झाली. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -