मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; ५ जण जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. इको (Eco) आणि एसटी (ST Bus) बस यांच्यात हा अपघात (Accident) शनिवारी संध्याकाळच्या सुमारास घडला.

kargil to srinagar zojila pass road accident tavera vehicle fell 500 feet in zojila ditch 8 people feared dead
कारगिलहून श्रीनगर मार्गावरील 500 फूट खोल दरीत कोसळली कार; ८ जणांचा मृत्यू झाल्याची भीती

मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. इको (Eco) आणि एसटी (ST Bus) बस यांच्यात हा अपघात (Accident) शनिवारी संध्याकाळच्या सुमारास घडला. या अपघातात ५ जण जखणमी झाल्याचे समजते. गुणाजी रत्नू लिगम , आराध्य सचिन लिगम, अथर्व सचिन लिगम, सचिन निकम व सानिका सचिन निकम अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत. या जखमी प्रवाशांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात जखमी झालेले प्रवासी हे रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात राहणारे रहिवाशी आहेत. इको गाडीमधून जात असताना मुंबईतून कोकणात निघालेल्या ‘मुंबई-उटबर’ या एसटी बसला या इकोने धडक दिली. केंबुर्ली गावाच्या हद्दीत असलेल्या सिद्धेश हॉटेलजवळ हा अपघात झाला. अपघातात इको कारच्या समोरच्या भागाचा चेंदामेंदा झाला. तर एसटीच्याही समोरच्या भागाचं नुकसान झाले आहे.

या अघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी बचाव कार्याला सुरूवात केली. त्यानंतर पोलिसांनीही (Police) या अपघाताचा तपास केला. अपघातानंतर गाडी महामार्गावरून बाजूला घेण्यात आली. अपघाचामुळे काहीकाळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यासह देशभरात रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाहन चालवताना वेगाचा अंदाज न आल्याने अनेकांना गाडीवरील ताबा सुटल्याने जीव गमवावा लागत आहे. शिवाय, वारंवार पोलिसांकडूनही वाहन चालवताना सुरक्षा बाळगा आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करा. परंतु, याकडे वाहनचालकांकडून दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे.


हेही वाचा –  उत्तर प्रदेशातील केमिकल फॅक्ट्रीमध्ये बॉयलरचा स्फोट, ९ कामगारांचा मृत्यू