उत्तर प्रदेशातील केमिकल फॅक्ट्रीमध्ये बॉयलरचा स्फोट, ९ कामगारांचा मृत्यू

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हापुर (Hapur) येथील केमिकल फॅक्ट्रीमध्ये (Chemical factory) एका बॉयलरचा भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये ९ कामगारांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तर काही जणांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना झाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. तसेच पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरू आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट इतका भीषण होता की, त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू येत होता. हापूर जिल्ह्यातील धौलाना भागात यूपीआयडी कारखाना आहे. या कारखान्यात केमिकल बनवले जाते. शनिवारी दुपारी अचानक कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाला. येथे फॉरेन्सिक आणि अन्य पथकं पोहचली असून घटनेचा तपास करत आहेत, अशी माहिती आयजी प्रवीण कुमार यांनी दिली आहे. दुर्घटना झालेल्या फॅक्ट्रीमध्ये अद्याप अनेक कामगार अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरच्या माध्यमातून या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला शोक – 


हेही वाचा : Maharashtra Corona Update : राज्यात मागील २४ तासांत १ हजार ३५७ कोरोना रुग्णांची नोंद; तर एकाचा मृत्यू