घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात XBB.1.16 सबव्हेरिएंटची सर्वाधिक प्रकरणे; कोरोना रुग्णांत झपाट्याने वाढ?

महाराष्ट्रात XBB.1.16 सबव्हेरिएंटची सर्वाधिक प्रकरणे; कोरोना रुग्णांत झपाट्याने वाढ?

Subscribe

भारतीय SARS-Cov-2 Genomics Consortium (INSACOG) च्या आकडेवारीनुसार, या प्रकाराची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात 105, तेलंगणात 93, कर्नाटकात 61 आणि गुजरातमध्ये 54 आहेत. XBB 1.16 व्हेरियंटचे दोन नमुने जानेवारीमध्ये आढळले. फेब्रुवारीमध्ये, XBB 1.16 प्रकाराचे 140 नमुने आढळले. तसेच, मार्चमध्ये आतापर्यंत XBB 1.16 प्रकाराचे 207 नमुने आढळून आले आहेत.

देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी 1 हजार 300 नवीन प्रकरणे समोर आली. देशात कोविड 19 च्या XBB.1.16 या नव्या सबव्हेरिएंटमुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. गेल्या तीन आठवड्यांत ज्या पाच राज्यांत सध्या सर्वाधिक रुग्णसंख्या आहे, त्यापैकी चार राज्यांमध्ये हा सबव्हेरिएंट आढळून आला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिका-यांनी सांगितल्याप्रमाणे, कोरोना वाढत आहे किंवा बाधितांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे किंवा या वाढत्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे असे कोणतेही पुरावे नाहीत, असे आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

नवीन प्रकरणांमध्ये वाढ होण्यामागे COVID-19 चा XBB.1.16 आहे असे मानले जाते. INSACOG डेटानुसार, XBB.1.16 प्रकाराचे एकूण 349 नमुने आतापर्यंत आढळले आहेत. हा सबव्हेरिएंट नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आढळून आला आहे.

भारतीय SARS-Cov-2 Genomics Consortium (INSACOG) च्या आकडेवारीनुसार, या प्रकाराची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात 105, तेलंगणात 93, कर्नाटकात 61 आणि गुजरातमध्ये 54 आहेत. XBB 1.16 व्हेरियंटचे दोन नमुने जानेवारीमध्ये आढळले. फेब्रुवारीमध्ये, XBB 1.16 प्रकाराचे 140 नमुने आढळले. तसेच, मार्चमध्ये आतापर्यंत XBB 1.16 प्रकाराचे 207 नमुने आढळून आले आहेत.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाचे विधान

केंद्रीय आरोग्य सचिवांनी गुरुवारी सांगितले की, जगात एका दिवसात कोविडचे 94 हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. अजूनही कोरोनाचे सावट कायम आहे कारण नवीन प्रकरणे समोर येत आहेत. जगातील 19% प्रकरणे यूएसएमधून, 12.6% रशियामधून आणि 1% रुग्ण भारतात आढळत आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, महाराष्ट्र, गुजरात, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. 16 मार्चला मी वैयक्तिकरित्या या राज्यांना पत्र लिहून काय खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले आहे.

( हेही वाचा: पालकांच्या खिशाला लागणार कात्री, स्कूल बसचे शुल्क वाढणार )

तज्ज्ञ काय म्हणतात?

बुधवारी एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितले की, कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ होण्यामागे नव्याने आढळलेले सबव्हेरिएंट कारणीभूत असू शकतात. परंतु हे नवे व्हेरिएंट गंभीर आजार वा मृत्यूला कारणीभूत ठरत नाहीत तोपर्यंत घाबरण्याची गरज नाही.

गुलेरिया म्हणाले की, जेव्हा कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाला तेव्हा तो अल्फा, बीटा, गामा, डेल्टा आणि ओमिक्रॉन प्रकारांसह झाला. अशा प्रकारे व्हायरस बदलत राहिला. सुदैवाने, जर आपण गेल्या एका वर्षाचा विचार केला तर असे प्रकार समोर आले आहेत जे ओमिक्रॉनचेच उप-प्रकार आहेत. त्यामुळे हा विषाणू काही प्रमाणात स्थिर झालेला दिसतो आणि पूर्वीप्रमाणे वेगाने बदलला नाही.

( हेही वाचा: ‘गिरणा अ‍ॅग्रो’मध्ये दोषी असेल तर राजकारण सोडेन-दादा भुसे )

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी जीनोम सिक्वेन्सिंगला गती देण्याच्या सूचना दिल्या होत्या. ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावेत, यावरही या बैठकीत भर देण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -