घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023Breaking : विधिमंडळ आवारात आचारसंहिता, एसओपी तयार करण्याची राहुल नार्वेकरांची घोषणा

Breaking : विधिमंडळ आवारात आचारसंहिता, एसओपी तयार करण्याची राहुल नार्वेकरांची घोषणा

Subscribe

Maharashtra Assembly Budget 2023 | आजही सभागृहाचं कामकाज सुरू होताच सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले. परिणामी सभागृहाचे कामकाज दोनवेळा स्थगित करावं लागलं.

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात काल, गुरुवारी सत्ताधाऱ्यांनी जोडे मारो आंदोलन केले. विधानभवन परिसरात घडलेली ही अत्यंत निंदनीय घटना असल्याचं सांगत काँग्रेस नेते बाळासाहेब थारोतांनी याविषयी सभागृहात मुद्दा उचलून धरला. गुरुवारपासून याविषयावर चर्चा सुरू होती. आजही सभागृहाचं कामकाज सुरू होताच सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले. परिणामी सभागृहाचे कामकाज दोनवेळा स्थगित करावं लागलं. अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी विधिमंडळ परिसरातील आचारसंहितेसाठी एसओपी तयार करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.

हेही वाचा आमच्याकडेही जोडे आणि तुमच्या नेत्यांचे फोटो आहेत, राहुल गांधींविरोधातील आंदोलनाननंतर बाळासाहेब थोरात आक्रमक

- Advertisement -

राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारताची प्रतिमा मलीन केली. तसंच, स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अपशब्द वापरले यावरून सत्ताधाऱ्यांनी गुरुवारी विधिमंडळ परिसरात पायऱ्यांवर राहुल गांधी यांच्या छायाचित्रावर जोडे मारले. यावरून काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात मुद्दा उचलून धरला. राष्ट्रीय नेत्याविषयी अशापद्धतीने जोडे मारो आंदोलन विधिमंडळ परिसरात करणे हे असंसदीय असून निंदनीय आहे, त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी बाळासाहेब थोरातांसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी केली. यावरून आज सभागृहात खडाजंगी झाली. सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले. सत्ताधाऱ्यांचा निषेध करताना विरोधकांनी सभागृहातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. सभागृहात गोंधळ वाढल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सभागृह २० मिनिटांसाठी स्थगित केलं. २० मिनिटांनी सभागृहाला सुरुवात होताच गोंधळ पुन्हा वाढला. त्यामुळे सभागृह पुन्हा २० मिनिटांसाठी स्थगित करावं लागलं.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्यासोबत एक बैठक घेतली. विधिमंडळाच्या आवारात घडलेल्या घटनेचे तपशील तपासून यासंदर्भात उद्या कारवाई करण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले. याविषयी माहिती देताना राहुल नार्वेकर म्हणाले की, सभागृहात आणि सभागृहाबाहेर जे काही घडलं त्याचा संपूर्ण रेकॉर्ड आम्ही तपासून घेणार आहोत. रेकॉर्ड तपासल्यानंतर उद्या योग्य ती कारवाई केली जाईल, असं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

तसंच, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय नेत्यांविषयी विधानभवनाच्या आवारात वारंवार अशा घटना घडत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी विधिमंडळ आवारातील आचारसंहितेसाठी एसओपी तयार करण्यात येणार आहे. या एसओपीचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, याविषयी सदस्यांना माहिती पुरवली जाईल, असंही राहुल नार्वेकरांनी पुढे स्पष्ट केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -