घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी खोटे आरोप, शेवाळेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी खोटे आरोप, शेवाळेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरण लोकसभेत पोहोचले आहे. सीबीआयचा अहवाल आल्यानंतर खासदार राहुल शेवाळे यांनी याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. त्यावर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी शेवाळेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी खोटे आरोप करण्यात आल्याचे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरेंनी विधिमंडळा बाहेरील प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, लव्ह यू मोर इतकंच म्हणेन. त्या घाणीत मला जायचं नाहीये. ज्यांची निष्ठा स्वत:च्या घरात नसते. त्यांनी दोन ते वेळा गद्दारी केली आणि आमच्यासोबत सुद्दा गद्दारी केली. त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला काहीही अपेक्षित नाही. जर आपण बघितलं तर ४० गद्दार आमदार आणि १२ गद्दार खासदारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या मित्रपक्षाकडूनही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. एनआयटी घोटाळा हा मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी आणि त्यांना वाचवण्यासाठी हे सगळं सुरू आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

राज्यपालांनी जे आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्यासंदर्भात राज्यपालांवर महाराष्ट्रात तुफान राग आहे. ज्या राज्यपालांनी मुंबईतील विधिमंडळाचा अपमान केला. भाषण न देता ते निघून गेले. आम्ही विरोधी पक्षांनी सभागृहात कर्नाटकच्या विषयासंदर्भात बोलण्याचा प्रयत्न केला. एनआयटीचा मुद्दाही मांडला. परंतु आम्हाला कुठेही बोलून दिलं नाही. माईकही बंद ठेवण्यात आले होते. महाराष्ट्रातील खरे प्रश्न बाजूला ठेवून अशा प्रकारे घाणेरडी बदनामी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मला त्यामध्ये जायचं नाहीये. मूळ गोष्टी एकच आहे की, ज्या मुख्यमंत्र्यांनी आज राजीनामा दिला पाहीजे, त्यांना वाचविण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

लोकसभेत केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे की, या प्रकरणात रिया चक्रवर्तीला ४४ कॉल करण्यात आले. असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, ते म्हणाले की, त्यांच्या चौकशीत जे काही आलं असेल ते आलं असेल. मुख्यमंत्र्यांनी घोटाळा केला आहे की नाही, यावर पहिली चौकशी झाली पाहिजे. दुसरं म्हणजे राज्यपालांना वाचवलं का जातंय?, यासंदर्भात चौकशी झाली पाहीजे, असंही ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

राहुल शेवाळेंचा आरोप काय?

सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाच्या फोनवर एयू नावाने ४४ कॉल्स आले होते. एयू म्हणजे आदित्य उद्धव असं बिहार पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं आहे, अशी माहिती शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत सादर केली. त्यामुळे याप्रकरणातील खरी माहिती केंद्रीय यंत्रणांनी सार्वजनिक करावी, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे. शिवसेनेतील (शिंदे गट) नेत्यानेच शिवसेना पक्षप्रमुख आणि त्यांच्या मुलावर आरोप केल्याने आता राज्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटणार आहे.

सुशांतसिंह मृत्यूप्रकरणाची चौकशी तीन पातळ्यांवर झाली. मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि सीबीआयकडून याप्रकरणाची चौकशी झाली. मात्र, तिन्ही यंत्रणांकडून आलेल्या अहवालात तफावत आहे. सुशांतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला एयू नावाने ४४ कॉल आले होते. या ‘एयू’बाबत मुंबई पोलिसांनी वेगळा अहवाल दिला होता. तर, बिहार पोलिसांनुसार ‘एयू’ म्हणजे ‘आदित्य उद्धव’ आहे. सीबीआयने एयूबाबत अहवाल दिलेला नाही. त्यामुळे रिया चक्रवर्तीला  कॉल केलेला एयू नक्की कोण याची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली आहे.


हेही वाचा : सुशांतसिंह मृत्यूप्रकरण : आदित्य ठाकरेंवर राहुल शेवाळेंचे लोकसभेत गंभीर आरोप


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -