घरताज्या घडामोडीअसे कृत्य खपवून घेतले जाणार नाही, वनरक्षक दाम्पत्याच्या मारहाणीची आदित्य ठाकरेंकडून दखल

असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही, वनरक्षक दाम्पत्याच्या मारहाणीची आदित्य ठाकरेंकडून दखल

Subscribe

साताऱ्यातील पळसवडे गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. माजी सरपंच आणि त्याच्या पत्नीने मिळून एका गर्भवती वनरक्षक महिलेसह पतीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. तसेच घटनेची व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. साताऱ्यातील मारहाणप्रकरणी माजी सरपंच रामचंद्र जानकरला पोलीसांनी अटक केली आहे. दरम्यान, असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असं ट्विट करत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वनरक्षक दाम्पत्याला मारहाण प्रकरणी दखल घेतली आहे.

आरोपीला आज सकाळी अटक करण्यात आली असून त्याला कठोर कायद्याचा सामना करावा लागणार आहे.  महिलांविषयी असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं आहे.

- Advertisement -

गर्भवती महिलेला मारहाण 

ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून माजी सरपंच रामचंद्र जानकर आणि महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे ही महिला गर्भवती असून सुद्धा तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. मला न विचारता मजूर दुसरीकडे का नेले, या कारणावरून आणि संतापाच्या भरातून माजी सरपंचाने त्यांना मारहाण केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, सातारा पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सरपंचाला अटक केली आहे. माजी सरपंच रामचंद्र जानकर हे वन समितीचे अध्यक्ष आहेत. या मारहाणी प्रकरणी राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली असून मारेकऱ्याला कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


हेही वाचा : Goa Assembly Election 2022 : गोव्यातील चित्र आजही धुसर आणि अस्पष्ट, त्रिशंकू विधानसभेकडे वाटचाल : संजय राऊत


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -