घरमहाराष्ट्रJitendra Awhad : मविआच्या बैठकीनंतर आव्हाड म्हणाले, आघाडी म्हटलं की मतभेद असतात;...

Jitendra Awhad : मविआच्या बैठकीनंतर आव्हाड म्हणाले, आघाडी म्हटलं की मतभेद असतात; पण…

Subscribe

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा एकला चलो रे चा नारा, ठाकरे गटाने सांगलीत उमेदवार घोषित केल्यामुळे काँग्रेसची नाराजी, या सर्व पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीची आज (28 मार्च) मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आजच्या बैठकीत जागावाटप आणि आगामी निवडणुकीच्या एकत्रित प्रचारावर चर्चा झाली. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रहितासाठी एकत्र यायला पाहिजे, संविधान विरोधी लोकांविरोधात लढायला पाहिजे, असं आव्हानही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केलं. (After the meeting of Mavia Jitendra Awhad said Aghadi means there are differences)

हेही वाचा – Ramtek : रश्मी बर्वेंचे जातप्रमाणपत्र रद्द तर, उमेदवारी अर्जही बाद; आता काँग्रेस काय करणार?

- Advertisement -

बैठकीची माहिती देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आजच्या बैठकीत येणाऱ्या निवडणुकांमध्ये एकत्र प्रचार कसा करायचा, लोकांपर्यंत कसं पोहचायचं आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं कॅम्पेन पॉझिटीव्ह असावं यावर चर्चा झाली. यावेळी काही प्रेझेंटेशन झालं. तसेच पुढच्या दीड-दोन महिन्यातील प्रचार आणि घोषणा कशी असावी याबाबत आम्ही आज चर्चा झाल्याचंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

आघाडीतील मतभेदांवर भाष्य करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आघाडी म्हटलं की मतभेद असतात, कोणीतरी नाराज हे होतंच, पण शेवटी मन एकत्र करून पुढं जायचं असतं. त्यामुळे आजच्या बैठकीत खेळीमेळीच्या वातावरणात प्रचार कसा असावा याबाबत आम्ही चर्चा केली. तसंच निवडणुकीत ‘बस हुई महंगाई की मार, बस हुई मोदी सरकार’ अशा घोषणा तयार करण्यावरही चर्चा झाली. तसेच गोविंदा ज्यावेळी सुपरहिट होता तेव्हा तो आमच्याकडे होता. आता तो बाजूला केलेला माल आहे, त्यामुळे आता तो कुठेही जाऊद्या, असे उत्तर जितेंद्र आव्हाड यांनी गोविंदाच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशावर दिले.

- Advertisement -

हेही वाचा – Congress VS BJP : बावनकुळेंकडून आचारसंहितेचा भंग, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल

आंबेडकरांनी राष्ट्रहितासाठी एकत्र यायला पाहिजे 

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी बैठकीला न बोलावल्याचा आरोप केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आंबेडकरांचं मविआमध्ये नेहमीच स्वागत आहे. आम्ही अजून त्यांना बैठकीसाठी बोलवतो आहोत. आपण एकत्र बसून चर्चा करुया, मार्ग काढुया असं आम्ही सांगतो आहोत. आंबेडकर खूप मोठे माणूस आहेत. बैठकीला छोटे छोटे लोक असतात, परंतु त्यांची उंची खूप मोठी आहे. त्यामुळे बैठकीत काय घडलं हे सर्व त्यांना आम्ही फोनवरून सांगत असतो. आमच्याकडे लपवण्यासारख काही नाही. राष्ट्रहितासाठी त्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि संविधान विरोधी लोकांविरोधात लढायला पाहिजे, असं आव्हानही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -