घरमहाराष्ट्रअग्निवीर जवानाचा उष्माघाताने मृत्यू; नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमधील घटना

अग्निवीर जवानाचा उष्माघाताने मृत्यू; नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमधील घटना

Subscribe

राज्यात उष्माघाताने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. खारघरमधील घटनेनंतर आता एका अग्निवीराचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये ही घटना घडली आहे.

राज्यात उष्माघाताने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. खारघरमधील घटनेनंतर आता एका अग्निवीराचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये ही घटना घडली आहे. हर्षल संजय ठाकरे ( वय वर्षे 21 ) असे या मृत अग्निवीराचे नाव आहे. तो धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहे. ( Agniveer dies of heatstroke Incidents at the Artillery Center of Nashik )

धुळे जिल्ह्यातील हर्षल ठाकरेची अग्निवीर जवान म्हणून निवड झाली आहे. त्याचे नाशिकच्या आर्टिलरी सेटंरमध्ये प्रशिक्षण सुरु होते. मात्र त्याला अचानक उलट्या सुरु झाल्या, तापही आला. लान्स नायक नरेंद्र सिंह यांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डाॅक्टरांनी ठाकरे याला तपासून मृत घोषित केलं. याप्रकरणी देवळाली क‌‌ॅम्प पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

- Advertisement -

उष्माघात म्हणजे काय?

उष्माघाता म्हणजे हीट स्ट्रोक किंवा त्याला सनस्ट्रोक असंही म्हंटल जाते. जास्तीच्या तापमानाला सामोरे गेल्याने शरिरातील ऊष्णता संतुलित न राहता शरीरात हिट वाढते. वातावरणातील जास्त तापमान किंवा जोरदार हवामान बदलामुळे आपल्याला शरीराला उन्हाचे तापमान सहन होत नाही आणि त्यामुळे ऊष्माघात होतो.

( हेही वाचा: सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर मराठा समाज आक्रमक; मुख्यमंत्र्यांनाही दिला इशारा )

- Advertisement -

उष्माघाताने मृत्यू होण्याची कारणं काय?

1. आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात.

2. घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे.

3. पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं.

4. जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.

5. स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू ही निकामी होतात.

6. रक्तातलं पाणी कमी झाल्या मुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.

7. माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.

8. उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -