घरताज्या घडामोडीसर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर मराठा समाज आक्रमक; मुख्यमंत्र्यांनाही दिला इशारा

सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर मराठा समाज आक्रमक; मुख्यमंत्र्यांनाही दिला इशारा

Subscribe

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. याचिका फेटाळल्याने सरकारला मोठा धक्का बसला आहे.

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. याचिका फेटाळल्याने सरकारला मोठा धक्का बसला आहे. मराठा आरक्षणाची याचिका राज्य सरकार बाजू मांडण्यास कमी पडल्यामुळेच फेटाळण्यात आल्याचा आरोप मराठा समाजाने केला आहे. दरम्यान, न्यायालयाने याचिका फेटाळल्याने राज्यात पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाला आहे. (Maratha Samaj To Protest For Maratha Reservation In Mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, मराठा समाजाने आता थेट तुळजापूर ते मंत्रालय असा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या महामोर्चाच्या निमित्ताने एक मराठा, लाख मराठा ही घोषणा पुन्हा एकदा गुंजणार आहे. याशिवाय, मराठा समाजाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा देखील देण्यात आला आहे. त्यानुसार, “आरक्षणाचा प्रश्न लवकर सोडवला अन्यथा मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीची शासकीय पूजा करू देणार नाही”, असा इशारा मराठा समाजाच्यावतीने घेण्यात आला आहे.

- Advertisement -

(हेही वाचा – …म्हणून कर्नाटकात मुस्लिमांचे 4 टक्के आरक्षण रद्द केले; अमित शाहांनी दिलं स्पष्टीकरण )

मागील अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाज आक्रमक झाला आहे. सरकारचा निषेध म्हणून मराठा समाजाच्यावतीने पंढरपुरमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला आहे.

- Advertisement -

मराठा समजाचा मोर्चा

  • मराठा समाजाच्यावतीने तुळजापूर ते मुंबईपर्यंत मोर्चा छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत एल्गार पुकारणार आहे.
  • एक महिनाभर मराठा समाजाचे कार्यकर्ते तुळजापूर ते मुंबई मंत्रालय पायी यात्रा काढणार आहेत.
  • 6 जूनला मुंबईमधील आझाद मैदानावर शिवराज्याभिषेक दिन साजरा करणार असल्याची भूमिका मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

हेही वाचा – US Mass Shooting: अमेरिकेत पुन्हा गोळीबार, एका मुलीसह ८ जण जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -