राज्य सरकारने नौटंकी बंद करावी, स्वहस्ते नियुक्तीपत्रे देण्यावरून अजित पवारांचा घणाघात

गवेगळ्या डिपार्टमेंटची भरती झाली. कधीही भरती होत असताना त्यांची ऑर्डर मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देत नव्हते. कधीच देत नव्हते. उमेदवार परीक्षा देऊन पास होतात. वशीला लावत नाहीत. एमपीएससी किंवा इतर परीक्षेतून ते नियुक्त होत असतात, असं अजित पवार म्हणाले.

ncp leader ajit pawar apologized for wrongly mentioning savitribai fule

मुंबई – केंद्र सरकारच्या नव्या योजनेनुसार रोजगार मेळाव्यानिमित्त मुख्यमंत्री अनेकांना स्वहस्ते नियुक्तीपत्रे देत आहेत. मात्र, यावरून राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी घणाघात केला आहे. नियुक्तपत्र देण्याची नौटंकी बंद करा, असं अजित पवार म्हणाले आहेत. विद्यार्थी स्वतःच्या मेहनीते पुढे येऊन अभ्यास करतात आणि पास होतात, त्यामुळे सरकारने नौटंकी करू नये, असं अजित पवारांनी (Opposition Leader Ajit Pawar) स्पष्ट केलं. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर लागल्या पाहिजेत, अजित पवारांची मागणी

अजित पवार म्हणाले की, आजपर्यंत राज्याची निर्मिती झाल्यापासून आतापर्यंत अनेक भरत्या झाल्या. पोलीस भरती झाली, महावितरणची भरती झाली. शिक्षकांची भरती झाली. वेगवेगळ्या डिपार्टमेंटची भरती झाली. कधीही भरती होत असताना त्यांची ऑर्डर मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देत नव्हते. कधीच देत नव्हते. उमेदवार परीक्षा देऊन पास होतात. वशीला लावत नाहीत. एमपीएससी किंवा इतर परीक्षेतून ते नियुक्त होत असतात, असं अजित पवार म्हणाले.

सरकारच्या नाकर्तेपणामुळे, दुर्लक्षपणामुळे मोठे उद्योग परराज्यात गेले. त्यामुळे तरुण मुला-मुलींच्या मनात सरकाविषयी वेगळं वातावरण निर्माण झालं आहे. हे वातावरण दडपण्याचा केविलवाणा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. त्यामुळे सरकार तरुणांना स्वहस्ते ऑर्डर देत आहेत. ऑर्डर पोस्टाने जाईल, इमेलने जाईल. पण असा प्रकार पहिल्यांदाच पाहिला. आम्ही आर आर पाटील यांच्या काळात दरवर्षी १३ हजार भरती करत होतो. म्हणजे ६५ हजारांची भरती केली. पण असा दिखावा केला नाही. त्यामुळे सरकारने ही नौटंकी बंद करावी, असं अजित पवार म्हणाले आहे.

हेही वाचा – आमच्या आराध्य दैवतांचा ‘भाजपाच्या आराध्य दैवतां’कडून अपमान; संजय राऊतांचा हल्लाबोल