घरमहाराष्ट्रअजित पवार गोड माणूस... संजय राऊतांनी केले चक्क कौतुक

अजित पवार गोड माणूस… संजय राऊतांनी केले चक्क कौतुक

Subscribe

मुंबईः अजित पवार गोड माणूस आहे. आम्ही सर्व त्यांच्यावर प्रेम करतो. माझे पवार कुटुंबातील कोणाशी वाद नाहीत. कधीच नव्हते, असा खुलासा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत आणि अजित पवार यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरु आहे. कोण संजय राऊत असा सवाल अजित पवार यांनी पुणे येथे केला. त्यावर संजय राऊत यांनी हे उत्तर दिले.

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले, अजित पवार आणि मी एकत्र जेवलो आहे. पुन्हा एकत्र जेऊ. अजित पवार गोड माणूस आहे. आम्ही सर्व त्यांच्यावर प्रेम करतो. अजित पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख घटक आहेत. आमच्यात फुट पाडण्याचा भाजपचा डाव आहे. आम्ही हा डाव हाणून पाडू. सध्या महत्त्वाचा मुद्दा खारघर येथील श्रीसेवकांच्या मृत्यूचा आहे. त्यावर आम्ही बोलत आहोत. या घटनेत ५० श्रीसेवकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. या मागणीशी मी सहमत आहे. तसेच या घटनेसाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे म्हणणे आहे. पटोले यांचे हे म्हणणे रास्त आहे, असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.

मी महाविकास आघाडीबद्दल काही असे तर बोलणार. पण आमच्या घटक पक्षाबाबत बोलणार नाही. कॉंग्रेस असो की राष्ट्रवादी कॉंग्रेस, त्यांच्या पक्षात काय चाललंय याविषयी मी बोलणार नाही. तसा मला अधिकार नाही. त्यामुळे दैनिक सामनामध्ये जे लिहिले ते महाविकास आघाडीसंदर्भात होते, ते राष्ट्रवादी कॉंग्रेसवर लिहिले नव्हते, असेही राऊत यांनी सांगितले.

- Advertisement -

मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ता शिबिर होत आहे. या शिबिराला अजित पवार हे उपस्थित नाहीत. यावर संजय राऊत म्हणाले, तो राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या पक्षात काय चाललंय मी नाही सांगू शकत. कोणाला बोलवावं. कोणाला बोलवू नये हा त्यांचा प्रश्न आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -