घरताज्या घडामोडीRupali Patil Thombare: अखेर रुपाली पाटील ठोंबरे राष्ट्रवादीत! अजितदादांच्या उपस्थितीत प्रवेश

Rupali Patil Thombare: अखेर रुपाली पाटील ठोंबरे राष्ट्रवादीत! अजितदादांच्या उपस्थितीत प्रवेश

Subscribe

रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनलेला जय महाराष्ट्र केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अजित पवार यांनी रुपाली पाटील यांचे पक्षात स्वागत केले आहे. आगीतून उठून फुफाट्यात फडलो अशी वेळ येऊ देणार नाही असे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. रुपाली पाटील यांच्या येण्यामुळे पुण्यातील महिलांचे स्वप्न सोडविण्यासाठी मदत होणार असल्याचेही अजित पवार म्हणाले आहे.

पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रुपाली पाटील यांचे स्वागत केलं आहे. तसेच अजित पवार म्हणाले की, मनसेत काम करत असणाऱ्या रुपाली पाटील यांच्यासह अनेक महिलांनी भेट घेऊन चर्चा केली होती. रुपाली पाटील यांनी मनसेचा राजीनामा दिल्यानंतर टीव्हीवर एकच चर्चा होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जेवढी चर्चा होत नाही त्यापेक्षा अधिक रुपाली पाटील यांची चर्चा होत होती असे अजित पवार म्हणाले आहेत.

- Advertisement -

रुपाली पाटील यांच्या कामाची पद्धत माहिती

रुपाली पाटील यांचा स्वभाव आणि त्यांच्या कामाची पद्धत माहिती आहे. त्यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामाची पद्धत माहिती आहे. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यासाठी कामे गतीने करत आहोत. पालमकमंत्री म्हणून काम करत असताना रुपाली पाटील यांच्या काम पाहिलं आहे. पक्षात इतर महिलांप्रमाणे रुपाली पाटील यांनाही पुढे जाण्याचा फायदा होईल. रुपाली पाटील आक्रमकपणाने काम करत असतात. त्या निवडणुकांचा प्रचार करताना गर्भवती असतानाही प्रचार करत होत्या तेव्हा त्यांची प्रसुती झाली. एवढ्या बारकाईने लोकांचे प्रश्न त्या सोडवत असतात असे अजित पवार म्हणाले आहेत.

रुपाली पाटील ठोंबरे यांचा मनसला रामराम

रुपाली पाटील ठोंबरे यांनी मंगळवारी मनसेच्या सदस्य पदाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यावर रुपाली पाटील ठोंबरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना राजीनामा देण्याबाबत भूमिका स्पष्ट केली. बुधवारी मनसेच्या सदस्याचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांना कारण सांगितले असल्याचे रुपाली ठोंबरे पाटील यांनी सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे कायम ह्रदयात राहतील परंतु मनसेचा राजीनामा देत असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा :  रुपाली पाटील NCP मध्ये स्थिरावणार, म्हणाल्या… म्हणूनच ठरलंय !


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -