Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी तुषार भोसलेंमुळे अजित पवारांचं भाषण झालं नाही, अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

तुषार भोसलेंमुळे अजित पवारांचं भाषण झालं नाही, अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

Subscribe

पुण्यातील देहू येथे १४ जून रोजी संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करुन देण्यात आले नव्हते. त्यामुळे नवीन राजकीय वाद सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. परंतु तुषार भोसलेंमुळे अजित पवारांचं भाषण झालं नाही, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे.

अमोल मिटकरी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान कार्यालयाकडून पाठवलेल्या कार्यक्रम पत्रिकेवर भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांची सही आहे. त्यामुळे हा नवीन वाद निर्माण झाला आहे. अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी, अशी मागणी अमोल मिटकरींनी केली आहे.

- Advertisement -

पंतप्रधान कार्यालयाने आम्हाला टेंटीव्ह कार्यक्रम मागवला होता. अजित पवार हे मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून देहूतील कार्यक्रमाला आले होते. तीन दिवस अगोदर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पवार यांचे नाव मुख्य सचिवांकडे पाठवण्यात आले, असं तुषार भोसले म्हणाले.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा धारण करत भाजपचा निषेध केला आहे. अजित पवार यांना जाणीवपूर्वक भाषण करू न देणं हा भाजपाचा पूर्वनियोजित खेळी असल्याचा आरोप मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला होता. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला स्थानिक आमदार आणि खासदारांना प्रोटोकॉलप्रमाणे निमंत्रण दिले नसल्याने त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.


- Advertisement -

हेही वाचा  : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची धुरा आशिष शेलार यांच्या खांद्यावर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -