घरताज्या घडामोडी2024 ला भाजपचा भाजीपाला होईल, अमोल मिटकरींचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा

2024 ला भाजपचा भाजीपाला होईल, अमोल मिटकरींचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा

Subscribe

भाजप 2024 च्या निवडणुकीमध्ये 400 च्या पुढे जागा जिंकेल असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली होती. मोदींच्या नेतृत्वात ४०० पेक्षा जास्त जागा जिंकू असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलाय यावर राष्ट्रवादीकडून पलटवार करण्यात आला आहे. 2024 मध्ये भाजपचा भाजीपाला होईल असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील आता अस्वस्थ झाले आहेत असे विधानस अमोल मिटकरी यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र डागलं आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजप अधिक मतांनी जिंकून येईल असे दावे चंद्रकांत पाटील करत आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये तर लोकसभा निवडणुकीमध्येसुद्धा भाजपला चांगले यश मिळणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भेटीबाबत बोलताना सुरुवातीला सगळे सोबत येतात परंतु नंतर काय होतं ते सगळ्यांनी पाहिले आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले यावर राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी पलटवार केला आहे.

- Advertisement -

अमोल मिटकरी यांनी ट्विट करत भाजपचा भाजीपाला होणार असल्याचा इशारा दिला आहे. ‘2024 ला मोदीजी 400+. असे नवे भाकीत चंद्रकांत पाटील यांनी केले. तेलंगणा चे राव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवारांना भेटताच पाटील अस्वस्थ झालेत. त्यांचे हे भाकीत नसुन पोकळ अहंपणा आहे . 2024 ला याच अहंपणामुळे भाजपाचा भाजीपाला होईल हे नक्की. भाजीपाला’ अशा शब्दात मिटकरींनी भाजपवर निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भेटीवर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रया दिली. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, 2019 मध्ये असेच सर्व पक्ष एकत्र आले होते. मतमोजणीच्या वेळी सर्वजण नवेकोरे कोट घालून दिल्लीत आले परंतु त्यांचे काय झालं ते देशाने पाहिले आहे. आता पुन्हा 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मी पाटील आहे; संजय राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो, पण… चंद्रकांत पाटलांचा सूचक इशारा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -